ॲड उज्ज्वल निकम हा खोटारडा आणि निर्लज्ज माणूस आहे. कसाबच्या बिर्याणीबाबत त्यांचा खोटेपणा उघड झाला. खोटेपणाती त्यांनीच कबूली दिलेली आहे. आता पुन्हा हाच माणूस उलट्या उड्या मारतोय. एका विद्यमान महिला उमेदवाराला डावलून भाजपने ॲड. निकम यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे महिलांप्रती भाजपचा चेहरा उघड होत आहे. आता कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना निवडून देत मतदार भाजपाला धडा शिकवतील, अशी घणाघाती टीका कॉंग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य (CWC), सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या प्रमुख श्रीमती सुप्रिया श्रीनेत यांची विशेष पत्रकार परिषद मुंबई कॉंग्रेसच्या कार्यालयात झाली. यावेळी कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याबाबत माहिती त्यांनी दिलीच पण ४०० ची घोषणा करणाऱ्या भाजपने कॉंग्रेसची सत्ता येतेय हे मान्य केलंय असंही सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितलं.
मुंबईबाबतच्या प्रश्नावर बोलताना सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, भाजपला बाहेरून उमेदवार आयात करावे सागले. एक धादांत खोटं बोलणारा आहे. तर दुसरे उमेदवार पियुष गोयल यांना भूमीपूत्र असलेल्या कोळी समाजाचा ते अवमान करतात. हे गरीबांच्या विरोधातील लोक आहेत. कोळी माणसाचा वासही सहन न होणाऱ्या गोयल यांना सामान्य माणसं धडा शिकवतील. कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय ही भाजपला गुंगवणारी चाल आहे. यामुळे भाजपची रणनिती उद्धस्त झाली. आता अमेठीत एक सक्रीय कार्यकर्ता भाजपच्या उमेदवारावर सहज मात करेल, असा दावाही सुप्रिया श्रीनेत यांनी केला. मुंबईत इंडिया आघाडीचे सहाही उमेदवार जिंकणारच. देशभरातलं वातावरण भाजप आणि मोदींच्या विरोधातील आहे. याची जाणीव भाजपला होतेय. म्हणूनच कॉंग्रेस सत्तेवर आल्यास काय करेल याच्या खोट्या वावड्या उठवतायत, असं ठामपणे सांगताना सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षात काहीच काम न झाल्याने ते मोदी आणि भाजपच्या नेत्यांना ते सांगता येत नाहीय. म्हणूनच भाजपनेते कॉंग्रेस आणि राहूल गांधी यांचाच जप करतायत.
0 टिप्पण्या