महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्याना धडा शिकवन्याच्या नावाने भाजपाचे आज आंदोलन होणार असल्याची कावेबाज घोषणा बावनकुळे ह्यांनी केली आहे. भाजपवाल्यानी मनुस्मृतिबाबत होणारा विरोध दडपण्यासाठी डॉ बाबासाहेबाचा फोटो घटनेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करू सुरू केला असून राजकीय अजेंडासाठी भाजपवाल्यांनी बाबासाहेबांच्या आडून राजकिय पोळी भाजू नये असा इशारा वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांचे विरूद्ध दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.बाबासाहेबांचा नावाचा कैवार घेण्यासाठी तुम्ही तरी दुधाने धुतले नाहीत हे लक्षात ठेवा.
राज्यघटना तयार होत असताना भाजपच्या मातृसंघटनेनं अर्थात संघ आणि जनसंघानं बाबासाहेबांना त्रास दिला, त्यांचे पुतळे जाळले. राज्यघटनेला संघाने कधीच मान्य केले नाही. संघाचे दुसरे सरसंघचालक गोवळकरांनी राज्यघटनेला ‘ठिगळं लावलेली गोधडी’ संबोधून बाबासाहेबांचा अपमान केला होता.तेव्हा तुम्हीं कुठल्या बिळात लपून बसले होता ?भारतातील प्रतिष्ठेची आणि समानतेची शक्ती म्हणून संविधानवादाच्या संस्कृतीबद्दल बाबासाहेबांच्या दृढ विश्वासाच्या भावनेलाच पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील वर्तमान सरकारपासून धोका आहे . सत्तेच्या अभूतपूर्व केंद्रीकरणामुळे सत्ताधारी पक्षाने राज्याच्या विविध एजन्सी थेट आणि पूर्ण काबीज केल्या आहेत. राज्यघटनेतील बदलांबाबत भाजपचे नेते उघडपणे आणि निर्लज्जपणे बोलत आहेत.तेव्हा तुमची तोंडे कशी शिवली जातात ?
राजस्थानमधील बाडमेर येथे एका निवडणूक सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "देशाचे संविधान (भाजप) सरकारसाठी सर्वस्व आहे आणि बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी ते संविधान रद्द करू शकत नाहीत" हा तुम्हाला बाबासाहेबांचा अपमान का वाटला नाही ?डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकर भवन वर बुलडोझर चालविणारे हरिजन अधिकारी कर्मचारी फडणविस ह्यांनी प्रोटेक्ट केले होते.तुम्ही कोणत्या तोंडाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमान साठी आंदोलन करणार आहात?
भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील हे तर जाहीरपणे बरळले होते की ’फुले - आंबेडकरांनी भीक मागून शाळा उभारल्या’ हे विधान उच्च कोटीचा मूर्खपणा होता. सोबतच महापुरुषांच्या सामजिक सुधारणा कार्याच्या उभारणीला 'भीक' मागण्याची उपमा देणे, हा त्यांचा केलेला सर्वात मोठा अपमान होता, तेव्हा तुमचे बावनकुळे आणि भाजपवाल्याना लकवा मारला होता का ? तुमचे आंदोलन मनुस्मृतीला विरोध केला त्याचा सूड घेण्यासाठी त्यासाठी तुम्ही निम्मित शोधले आहे बाबासाहेबांच्या अवमानाचे.ही नाटकी आंदोलने बंद करा.
इतकाच पुळका असेल संवैधानिक व्यवस्था कायम रहावी तर संविधान बदलण्यासाठी ४०० पार म्हणणारे तुमचे नेते आणि दिल्लीत संविधान जाळले होते त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही त्यासाठी आंदोलने करा. दम असेल तर आधी आपल्या आंबेडकरद्रोही नेत्यांचे आणि संघी विचारधारे विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करा. मनुस्मृती साठी बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या ह्या मनुवादी आंदोलन कशासाठी होत आहेत, हे राज्यातील जनतेला खूप चांगल्या पद्धतीने माहित आहे.
- राजेंद्र पातोडे
- प्रदेश प्रवक्ता...वंचित बहुजन आघाडी...महाराष्ट्र प्रदेश.
भाजपचा ठाण्याचा माजी नगरसेवक मनोहर डुंबरे याचा आणि ठाण्यातल्या भाजपाच्या सर्व लोकांचा जाहीर निषेध....
काल महाड इथे मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हातून अनावधाने 25 डिसेंबर 1927 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड इथे मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले होते तो फोटो चुकून फाडला गेला त्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर माफी पण मागितली तरीपण आज दिवसभर बीजेपी ने पूर्ण राज्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केले... आता हेच भाजपवाले या मनोहर डुंबरे आणि भाजप च्या कार्यकर्त्यांच्या विरोधात किती आंदोलन करतात तेच बघायचे आहे....
Adv. Rahul Makhare ( फेसबुक पोस्ट)भाजप नेते व वेस्ट इंडियन लूक असणारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जितेंद्र आव्हाड यांचे विरोधात महाराष्ट्र्रात आंदोलन पुकारले आहे. बावनकुळे यातून संघ परिवार हा आंबेडकरवादी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बावनकुळे किंवा संघ परिवाराला आंबेडकरवादी म्हणणे म्हणजे हिजड्याला 303 किंवा व्हायग्रा च्या गोळ्या देऊन मर्द बनवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. 1948 ला याच संघ परिवाराने दिल्लीच्या रामलीला मैदानावर बाबासाहेंबांचा पुतळा जाळला होता. तो अनवधानाने नाही तर बाबासाहेबांचाच पुतळा जाळायचा म्हणून जाळला होता.कोणत्याही आरोपीची कोणतीही कृती हेतूच्या आधारे तपासली पाहिजे. त्याला कायद्याच्या भाषेत मेन्स रिया किंवा इंटेशन (हेतू) म्हणतात.जितेंद्र आव्हाडांचा हेतू पहाता कोणताही सामान्य बुद्धी असलेला व्यक्ती जितेंद्र आव्हाडांची कृती ही अनवधानाने झाली आहे असे सांगू शकतो...बावनकुळे व संघ परिवाराला शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याच्या झालेल्या प्रयत्नाच्या चर्चेला बंद करायचे आहे.त्यामुळेच त्यांनी उद्या आंदोलन पुकारले आहे. त्यातच अजित दादांच्या शपथविधी वेळी तोंड लपवणारे बाजारू विचारवंत अमोल मिटकरी यांनीही जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे. महाराष्ट्रात कोणत्याही गल्लीत जर ते फिरले तर त्यांना खर्जुले कुत्रेही विचारणार नाही एवढी त्यांची लायकी आहे.मा. प्रकाश आंबेडकर यांनीही जितेंद्र आव्हाड यांचेवर टीका केली आहे. त्यांचे बद्दल काही बोलायला नको...दिल्लीत संविधान जाळल्यावर हेच ते मा. प्रकाश आंबेडकर आहेत ज्यांनी फेसबुकवर येऊन सांगितले होते कि संविधान जाळले आहे...कोणीही आंदोलन करू नये. मी त्यांना फक्त रक्ताचा वारसदार म्हणू शकतो...त्यांना विचारांचा वारसदार म्हणणे म्हणजे बौद्धिक वेश्या व्यवसाय केल्यासारखे होईल.
0 टिप्पण्या