Top Post Ad

तरुणांच्या भविष्याचा जो विचार करेल तोच आमचा उमेदवार- आदित्य माहीमकर


 वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे  सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. देशात अनेक प्रश्न अनुत्तरीत असतानाच लोकसभेच्या निवडणुका लागल्या आहेत. मात्र आज जे उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत ते करोडपती आहेत. प्रचंड संपत्तीचे मालक असलेल्यांनाच पुन्हा निवडून द्यायचे का? असा सवाल आदित्य माहीमकर यांनी उपस्थित केला आणि आज आम्हाला युवकांचे प्रश्न सोडवणारा, सर्वसामान्य जनतेमधील उमेदवार हवा आहे. कारण या करोडपती उमेदवारांना  मतदान करणारे मतदार आहेत त्यांना महागाईची झळ पोहचत आहे. आज तरुणाला नोकरीची गरज आहे. मात्र त्यांचा आज या निवडणुकीत वापर रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरासारखा वापर करून घेतला जात आहे. यासाठीच त्यांना बेरोजगार ठेवण्यात आले आहे का?  तरुणांच्या भविष्याचा जो विचार करेल तोच आमचा उमेदवार असेल योग्य निर्णय अचूक दिशा सुसंस्कृत मुंबईची कर्तृत्वान आशा असल्याचा विश्वास माहीमकर यांनी व्यक्त केला. युवा से युवा या संस्थेचे प्रमुख आदित्य माहीमकर यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात सध्याच्या निवडणूक प्रक्रिया आणि उभे असलेले उमेदवार यावर  पत्रकार परिषदेत जोरदार टिका केली. 

या पत्रकार परिषदेनंतर  तीनहुन अधिक उमेदवारांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात अपक्ष  म्हणून आपला उमेदवारी अर्ज ओल्ड कस्टम येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भरला. इशा ठाणेकर, अनिता गालफाडे, कल्पना खलसोडे, आदींनी उमेदवारी अर्ज भरला आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा फोर्ट कालबादेवी मलबार हिल ताडदेव लालबाग शिवडी या ठिकाणी राहणारे रहिवासी यावेळी एकत्रित आलेले होते. या अपक्ष उमेदवारांना युवा से युवा ' या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आदित्य माहीमकर यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच अनेक अपक्ष उमेदवारांना लढण्याचे बळ आपली संघटना देईल असे यावेळी माहिमकर यांनी जाहिर केले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com