आज जागतिक पालक दिन आहे. जगात आपली ओळख आपल्या पालकांद्वारे केली जाते. आपले पालकच आपल्याला घडवतात आणि त्यांच्या नावानेच आपल्याला ओळख मिळते. आज आपण जे काही आहोत ते आपल्या पालकांच्या संस्कारांमुळे आणि त्यांनी दिलेल्या संगोपनामुळेच आहोत. पालक आपल्या मुलांना घडवण्यासाठी आपल्या संपूर्ण आयुष्यातील आनंदाशी तडजोड करतात. पालकांचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे जागतिक पालक दिन होय. जागतिक पालक दिन हा दरवर्षी १ जून रोजी साजरा केला जातो. दक्षिण कोरियामध्ये ८ मे रोजी आणि युनायटेड स्टेट्समध्ये जुलैच्या चौथ्या रविवारी पालक दिन साजरा केला जातो. दक्षिण कोरियन पदनाम १९७३मध्ये स्थापित केले गेले, पूर्वी ८ मे रोजी चिन्हांकित केलेल्या मदर्स डेच्या जागी, सार्वजनिक आणि खाजगी उत्सवांचा समावेश आहे. युनायटेड स्टेट्स दिवस १९९४मध्ये अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आला आणि १ जून हा दिवस पालकांचा जागतिक दिवस म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केला आहे. फिलीपिन्समध्ये तो काटेकोरपणे पाळला जात नाही किंवा साजरा केला जात नाही, तर दरवर्षी डिसेंबरचा पहिला सोमवार पालक दिन म्हणून घोषित केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने १ जून हा जागतिक पालक दिन म्हणून घोषित केला. "जगाच्या सर्व भागांतील सर्व पालकांचे मुलांशी निःस्वार्थपणे वचनबद्धतेबद्दल आणि या नातेसंबंधाचे पालनपोषण करण्यासाठी त्यांच्या आजीवन बलिदानाबद्दल कौतुक करण्यासाठी" भारतात दि.१४ फेब्रुवारी रोजी पालकांचा उपासना दिवस साजरा केला जातो.
जागतिक पालक दिनाची सुरुवात सर्वात आधी सन १९९४मध्ये यूएन जनरल असेंब्लीमध्ये झाली. पालकांचा सन्मान व्हावा म्हणून या दिनाची सुरुवात करण्यात आली. हा दिवस साजरा करण्याच्या कल्पनेला युनिफिकेशन चर्च आणि सेंटर ट्रेंट लॉट यांनी पाठिंबा दिला आणि तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सन २०१२मध्येच हा दिवस पालकांच्या सन्मानार्थ साजरा करण्यासाठी सर्वसाधारण सभेने निवडला होता. जागतिक पालक दिन हा दिवस मुलांच्या जीवनात पालकांचे महत्त्व नेमकं काय? हे पटवून देण्यासाठी साजरा केला जातो. पालकांची आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण भूमिका साजरी करण्यासाठी जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. काही ठिकाणी भाषणं, सभा, मैफिली आणि प्रदर्शनांचा समावेश करण्यात येतो. जगभरातील पालकांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. यावेळी आई-वडील आणि मुलांच्या नात्यात एक वेगळीच आपुलकी पाहायला मिळते. आई-वडिलांना देवाचे रूप मानले जाते. मुलांच्या सुखासाठी ते आयुष्यभर निस्वार्थपणे काम करतात. चांगल्या वाईट काळात त्यांच्या पाठीशी उभे राहतात. प्रत्येक पावलावर मुलांना साथ देतात. आपल्या मुलांना कशाचीही कमतरता भासू नये, यासाठी ते आयुष्यभर प्रयत्न करतात. मुलांच्या आनंदासाठी मेहनत करतात. म्हणूनच आई-वडील ही जीवनाची सर्वात मोठी देणगी मानली जाते. त्याची जागा आपल्या आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही. म्हणूनच दरवर्षी पालक दिन साजरा केला जातो.
पालक दिनानिमित्त आम्ही आमच्या पालकांसाठी आमची आवडती डिश तयार करू शकतो. त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकतो. पिकनिकची योजना आखू शकतो. आम्ही घरीच पार्टी करू शकतो. त्यांच्या गरजेची कोणतीही वस्तू त्यांना भेट म्हणून दिली जाऊ शकते. आम्ही त्यांचा आवडता चित्रपट त्यांच्यासोबत घरीही पाहू शकतो. त्यासोबत आम्ही मजेदार स्नॅक्सचा आस्वाद घेऊ शकतो. आई-वडील आपल्या आयुष्यासाठी जे काही करतात, त्यामागे कोणताही स्वार्थ लपलेला नसतो. आपल्या मुलांच्या सुखासाठी ते काहीही करायला तयार असतात. आपल्या यशामागे सर्वात मोठा हात पालकांचा असतो. मात्र, याबाबत त्यांनी दिलेल्या अमूल्य प्रेमाबाबत आपण त्यांचे कधीही आभार मानत नाही. जागतिक पालक दिन हा पालकांचे आभार मानण्याचा दिवस आहे. तसेच, आपले वृद्ध आई-वडील हे आपले ओझे नसून ते आपली जबाबदारी आहेत याची जाणीव करून देण्याचा दिवस आहे. ही जबाबदारी आपण कर्तव्य समजून पार पाडली पाहिजे. या निमित्ताने अनेक देशांत आई-वडिलांना शुभेच्छा, भेटवस्तू दिल्या जातात.
!! जागतिक पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
गडचिरोली.
0 टिप्पण्या