मराठी ज्येष्ठ नेते अशोक सराफ, निवेदिता जोशी, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, सुदेश भोसले इत्यादी मान्यवर, दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. 'स्वरस्वामिनी आशा' असं या पुस्तकांचं नाव आहे. आरएसएसप्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते या पुस्तकाचं उद्धाटन करण्यात आलं. गौतम राजध्यक्ष आणि आशाताईंना गुरुस्थानी असलेले यशवंत देव यांना हे पुस्तक अर्पण करण्यात आलं. यावेळी गायक सोनू निगम याने गुलाब पाण्याने आशाताईंचे पाय धुतले. वेद मंत्रांच्या घोषणांमध्ये सोनू निगमने आशाताईंचे पाय धुतले. पाय धुवून झाल्यानंतर सोनू निगमने साष्टांग दंडवत घालून आशाताईंना नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने ९१ दिव्यांनी आशाताईंचं औक्षण करण्यात आलं.
यावेळी आशाताईंनी त्यांच्या संगीत प्रवासातील अनेक आठवणी शेअर केल्या. यावेळी त्यांनी सर्व संगीतकारांचे आभार मानले. आजही मी अजूनही स्वत:ला विद्यार्थीच समजत असल्याचं म्हटत त्यांनी, मला महाराष्ट्रातील महिलांनी पार्श्वगायिका केलं असल्याचं सांगत त्यांचे आभार मानले. तसंच पुस्तक प्रकाशनासाठी संबंधित सर्वांचेही त्यांनी आभार मानले. आशाताईंनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सुधीर फडके यांच्या आठवणींना उजाळा दिला. आशाताईंनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी पहिल्यांदा मेकअप केल्याची आठवण शेअर केली. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात एका माणसाला विसरता येणार नाही, असं म्हणत त्यांनी मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टर यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, गौतम राजाध्यक्ष यांनी मला बोलावून तुम्हाला मेकअप करावा लागेल असं सांगितलं. ज्यावेळी मला मिकी यांनी मेकअप लावला त्यावेळी मी पहिल्यांदा रागवली होती हे काय केलं म्हणून, पण त्यांनी मला आता तुम्ही पाहू नका असं सांगितलं. त्यानंतर मेकअप संपला, आणि त्याने मला आरसा दाखवला. मी आरसा पाहून ही कोण आहे असा प्रश्न त्याला केला होता. त्यांनी केलेल्या मेकअपनंतर मी इतकी सुंदर दिसत होती. मिकीने मला अतिशय सुंदर मेकअप केला होता, असं म्हणत त्यांनी गौतम राजाध्यक्ष आणि मिकी कॉन्ट्रॅक्टरचे आभार मानले. मला कल्पनाही नव्हती की माझ्यावर असं कधी पुस्तक प्रकाशित होईल. प्रसाद बहाडकर, नरेंद्र हेटे, अमर हेटे, मंजिरी हेटे, प्रियांका जॉनी आशिष शेलार यांच्या प्रयत्नातून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आल्याचं आशाताई म्हणाल्या.
0 टिप्पण्या