मुंबई मराठी पत्रकार संघाची सार्वत्रिक निवडणूक शनिवारी २९ जून रोजी पार पडली. ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांचे समर्थ पॅनल आणि संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनल या दोन पॅनल मध्ये लढत झाली. .यामध्ये १४ पैकी १४ उमेदवार परिवर्तन पॅनलचे निवडून आले. अध्यक्ष, २ उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सरचिटणीस आणि ९ सदस्य यांचा दणदणीत विजय झाला. त्यात कार्यकारिणी सदस्यांच्या ९ जागांसाठी दोन पॅनेलचे एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. त्यात ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवलकर आणि दैनिक ' सामना ' चे पत्रकार देवेंद्र भोगले यांना सर्वाधिक आणि समसमान २८२ मते मिळाली. या निवडणुकीत एकूण ४८७ पत्रकार सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. भरभरून मते देत परिवर्तन पॅनलच्या नेतृत्वाला आणि १३ कार्यक्षम शिलेदारांची एकमताने निवड करून एकमुखी पसंती देणाऱ्या सदस्य पत्रकारांचे परिवर्तन पॅनलच्या उमेगवारांनी आभार व्यक्त केले.
अध्यक्षपदासाठी संदीप चव्हाण यांना ३१६ तर सुकृत खांडेकर यांना १६० मते मिळाल्याने संदीप चव्हाण यांची अध्यक्षपदावर निवड झाली. उपाध्यक्ष पदासाठी स्वाती घोसाळकर यांना २८८, राजेंद्र हुंजे यांना २२५ मते मिळाली तर उदय तानपाठक यांना २०८, विष्णू सोनवणे यांना २०३ मते मिळाली. सर्वाधिक मते मिळवल्याने उपाध्यक्षपदावर स्वाती घोसाळकर यांची निवड झाली. कार्यवाहपदी शैलेंद्र शिर्के यांची निवड झाली. तर कोषाध्यक्षपदी जगदीश भोवड यांचा २१० मतांनी विजय झाला. त्यांना ३३६ तर सारंग दर्शने यांना १२६ मते मिळाली. कार्यकारणी सदस्य पदासाठी देवेंद्र भोगले (२८२), दिवाकर शेजवलकर (२८२), गजानन सावंत (२७४), आत्माराम नाटेकर (२७३), विनोद साळवी (२७२), किरीट गोरे (२४७), अंशुमान पोयरेकर (२४६), राजेश खाडे (२४५), राजीव कुलकर्णी (२३४) यांना सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांची निवड झाली आहे.
कार्यकारणी सदस्य पदासाठी मिळालेली मते -
परिवर्तन पॅनल.....देवेंद्र भोगले (२८२), दिवाकर शेजवलकर (२८२), गजानन सावंत (२७४), आत्माराम नाटेकर (२७३), विनोद साळवी (२७२), किरीट गोरे (२४७), अंशुमान पोयरेकर (२४६), राजेश खाडे (२४५), राजीव कुलकर्णी (२३४)
समर्थ पॅनल.....कल्पना राणे (१८५), श्यामसुंदर सोन्नर (१७४), उमा कदम (१७२), रवींद्र भोजने (१६२), नंदकुमार पाटील (१६१), अरविंद सुर्वे (१४६), संतोष गायकवाड (१४२), विठ्ठल बेलवाडकर (११६), राजेंद्र साळस्कर (१०४), महेंद्र जगताप (९४), केतन खेडेकर (९२)
0 टिप्पण्या