मुंबई महानगर पालिकेच्या निविदेनुसार हँगिंग गार्डन येथील प्रस्तावित जुनी पाण्याची टाकी पाडणे आणि नवीन पाण्याची टाकी बांधणे याचा मी सतत पाठपुरावा करत आहे. या बद्दल हँगिंग गार्डन परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या हेरिटेज पाण्याच्या टाकीची दुरुस्ती केली जाऊ शकते आणि ती पाडण्याची गरज नाही, असा युक्तिवाद तज्ञांच्या तांत्रिक सहाय्याने वेळोवेळी करण्यात आला आहे. तसेच ही बाब प्रदीर्घ काळापासून रेंगाळत आहे. त्यामुळे मी मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांना विनंती केली आहे निविदा काढून टाका आणि झाडे न तोडता गरज असेल तिथे पाण्याच्या टाकीच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करा, असे पत्र पाठवले असल्याची माहिती आज मंत्री मंगलप्रभात लोंढा मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या सोबतच राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत पुढील ३ महिन्यात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रुपरेषा देखील त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितली. ज्यामध्ये १० जुन २०२४ पासून राज्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शाहू महाराज करिअर गायडन्स कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ज्याची सुरुवात १० जुन रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे येथील पंडीत भिमसेन जोशी कला मंदीर येथे संपन्न होत आहे. तसेच पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावे घेण्याचा कार्यक्रम राज्यातील १५० ठिकाणी ८ जुलै २०२४ पासून सुरुवात होत आहे. हे मेळावे जुलै व ऑगस्ट या महिन्यात पूर्ण होणार असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील प्रत्येक महसूली विभागात प्रत्येकी १ अंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधीनी उभारण्यात येत आहे. याद्वारे राज्यातील युवकांना विदेशात नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे संत गाडगेबाबत स्वच्छ भारत अकॅडमी राज्यातील ५ महसूली विभागात उभारण्यात येणार आहे. राज्यातील १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. राज्यातील १००० ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये प्रमोद महाजन ग्रामिण कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येत असून छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा महाकुंभाचे आयोजन बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करण्यात येणार आहे. तसेच जुलै व ऑगस्ट २०२४ मध्ये देशातील सर्व स्टार्टअपची २ दिवसीय कॉन्फरन्स मुंबई येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मंत्री महोदयांनी दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत बोलतांना लोढा यांनी आम्हाला फडणवीसांचे नेतृत्व हवे आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये. तर महाराष्ट्रातील भाजपच्या पिछेहाटीबाबत त्यांनी बोलण्याचे टाळले. शिंदे गटाचे आमदार ठाकरे गटात जाण्याची तयारी करीत असलेल्या चर्चेबाबत मंत्री लोंढा म्हणाले, या निव्वळ अफवा आहेत. असे काही घडणार नाही. याबाबत आम्हाला खात्री आहे.
0 टिप्पण्या