Top Post Ad

जाहिरातीच्या होर्डिंगला परवानगी दिल्याबद्दल कैसर खालीद या वरीष्ठ अधिकाऱ्याचे निलंबन

 


मुंबईतील घाटकोपर भागातील एका पेट्रोल पंपावर १३ मे रोजी जोरदार वारा आणि अवकाळी पावसात १४०x१२० फूट होर्डिंग पडले होते.  यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. 

या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने मंगळवारी आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांना निलंबित केले. त्यांनी डीजीपी कार्यालयाची परवानगी न घेता रेल्वेच्या जमिनीवर मोठे होर्डिंग लावण्याची परवानगी दिल्याचा आरोप आहे.  एजन्सीच्या म्हणण्यानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, होर्डिंगला मंजुरी देण्यात आयपीएसच्या बाजूने प्रशासकीय त्रुटी आणि अनियमितता होती. राज्याच्या गृह विभागाने खालिद यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत, जे सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक किंवा ADG (नागरी हक्कांचे संरक्षण) म्हणून कार्यरत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. आदेशात म्हटले आहे की 1997 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी हे मुंबईत सरकारी रेल्वे पोलिस आयुक्त होते, जेव्हा त्यांनी निविदा प्रक्रियेचे पालन न करता, त्यांनी इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या जाहिरात कंपनीला घाटकोपर (पूर्व) येथील GRP जमिनीवर मोठे होर्डिंग्ज उभारण्यास मान्यता दिली. निलंबनाच्या आदेशानुसार, होर्डिंग पडण्याच्या घटनेच्या संदर्भात प्राथमिक चौकशी करण्यात आली होती आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (डीजीपी) यांनी 21 मे रोजी गृह विभागाला सादर केलेल्या अहवालात मंजुरीमध्ये घोर अनियमितता आणि प्रशासकीय त्रुटी आढळल्या होत्या. 

हे निलंबन अशा वेळी करण्यात आले आहे जेव्हा मुंबई पोलिस होर्डिंगची मालकी असलेली कंपनी आणि आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या व्यावसायिक सहयोगीशी संबंधित अनेक पैशांच्या व्यवहारांची चौकशी करत आहेत. जाहिरात कंपनीचे संचालक भिंडे यांनी खालिद यांच्या पत्नीच्या कंपनीला ४६ लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी केला.  होर्डिंग अपघात प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) इगो मीडियाचे मालक भावेश भिंडे, कंपनीच्या तत्कालीन संचालक जान्हवी मराठे, त्यांचे सहकारी आणि स्ट्रक्चरल अभियंता मनोज संघू यांना अटक केली आहे, ज्यांनी होर्डिंगसाठी स्थिरता प्रमाणपत्र पूर्ण केले नव्हते. 

जाहिरातीच्या होर्डिंगला परवानगी दिल्याबद्दल कैसर खालीद या वरीष्ठ अधिकाऱ्याचे निलंबन, व हेमंत करकरेना मारण्याच्या कटात सामील असणाऱ्या दोन अतिरेक्यांना वाचविणा-या सदानंद दाते यांना एन आय ए चे प्रमुख पद. ---एस एम मुश्रीफ

            कैसर खालीद यांचे प्रकरण सद्या गाजत असल्यामुळे सर्वांना माहीत आहे. पण मुंबईचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त सदानंद दाते यानी 26/11च्या मुंबई हल्ल्याचेवेळी हेमंत करकरेना मारण्याच्या कटात सामील असणा-या कामा हॉस्पिटल मधील अभिनव भारत संघटनेच्या दोन अतिरेक्यांना जाणीवपूर्वक कसे वाचविले याची माहीती जनतेला नाही. किंबहुना ती जाणूनबुजून लपवून ठेवली. मी केलेल्या तपासात या संबंधीची खालील माहीती निष्पन्न झाली आहे:

१) कामा हॉस्पिटलमध्ये घुसलेले अतिरेकी अस्सलीत मराठी बोलत होते (टाइम्स ऑफ इंडिया, दि. २९ नोव्हे २००८ च्या अंकात वैद्यकीय शिक्षणचे तत्कालीन सचिव भूषण गगराणी यांच्या हवाल्याने दिलेली माहीती)( टाइम्स ऑफ इंडिया च्या रेकॉर्डमधून ही बातमी काढून टाकण्यात आली आहे, पण माझ्याकडे मूळ कात्रण आहे).
याचा अर्थ कामा हॉस्पिटल मधील अतिरेकी पाकिस्तानी नसून स्थानिक होते.
२) ते लिफ्टने हॉस्पीटलच्या टेरेसवर गेले व तेथे अडकून पडले.
३) त्यांना इतर पोलीस अधिकाऱ्यांनी मारू नये म्हणून कटात सामील असणाऱ्या एखाद्या वरीष्ठाने सदानंद दाते यांना कामा हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची सुटका करावी असा आदेश दिला असावा, कारण दाते यांना मुंबई आयुक्तालयातील त्यांच्या वरीष्ठांचा किंवा कंट्रोल रूमचा आदेश नसतानाही ते आपली हद्द सोडून कामा हॉस्पिटलमध्ये गेले.
४) सदानंद दाते यांनी कोर्टात दिलेल्या साक्षीवरून खालील बाबी स्पष्ट होतात. (कोर्टात दिलेल्या साक्षीचे पान नं. प्रत्येक मुद्याच्या शेवटी कंसात दिले आहेत.)
i) कामा हॉस्पिटल त्यांच्या हद्दीत येत नव्हते. साऊथ रिजनचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. वेंकटेशन यांचे विनंतीवरून ते तेथे गेले. (पान नं. ४६५८)
ii) त्यांचेकडे स्वयंचलित शस्त्र (कारबाईन) होते. (पान नं. ४६५८)
iii) त्यांनी बुलेट प्रुफ जॅकेट घातले होते. (पान नं. ४६६०)
iv) त्यांनी आपल्या सोबतच्या सर्व कर्मचाऱ्यांना (फक्त एक बेशुध्द व एक गंभीर जखमी असलेला कर्मचारी सोडून) व हॉस्पिटलच्या स्टाफला खाली पाठविले व ते एकटेच ६व्या मजल्यावर राहीले. (पान नं. ४६६२)
v) सर्वांना खाली पाठविल्यानंतर त्यांनी एका भींतीचा आसरा घेतला व टेरेसकडे ४० मिनिटे गोळीबार करीत राहीले. (पान नं. ४६६२)
vi) त्याना काही हालचालीची चाहूल लागल्यामुळे ज्या भींतीचा त्यांनी आसरा घेतला होता त्याच्या ते बाहेर आले व त्यांनी पाहीले की दोन व्यक्ती (टेरेसवरून ६व्या मजल्यावर येऊन) तेथून ५व्या मजल्याकडे जात आहेत. (पान नं. ४६६३)
vii) ही वेळ रात्री ११.५० ची असावी. (पान नं. ४६६३)
viii) त्यांनी वरीष्ठांना कळविले की दोन व्यक्ती सहाव्या मजल्यावरून खाली गेलेल्या आहेत व त्यांचेकडे स्वयंचलीत शस्त्रे व हँड ग्रेनेड आहेत. (पान नं. ४६६३)
ix) जेव्हा दोन अतिरेकी ५व्या मजल्याकडे जात होते तेव्हा त्यांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या; पण त्या त्यांना लागल्या किंवा नाही हे त्यांना माहित नाही. (पान नं. ४६६७)
x) त्यांनी बर्स्ट फायरींग (स्वयंचलित शस्त्रातून एका पाठोपाठ एक एकत्रित गोळ्या मारणे) केले नाही कारण त्यांच्याकडे मर्यादीत ॲम्युनिशन व मर्यादीत लोक होते.(पान नं ४६६७)

          सदानंद दाते यांनी कोर्टात दिलेल्या वरील साक्षीवरून खालील महत्वाचे मुद्दे उपस्थित होतात.
१) शहरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना सदानंद दाते वरीष्ठांच्या आदेशाशिवाय आपली हद्द सोडून कसे गेले?
२) दोन खतरनाक अतिरेकी टेरेसवर आहेत हे माहित असताना त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना खाली पाठवून ते एकटेच सहाव्या मजल्यावर कसे राहीले?
३) त्यांच्या समक्ष अतिरेकी सहाव्या मजल्यावरून पाचव्या मजल्यावर जात असताना त्यांना मारणे अगदी सोपे होते (sitting ducks).तरी सुध्दा ते त्यांना का मारू शकले नाहीत?
४) त्यांनी स्वयंचलित शस्त्रातून सलग गोळीबार (burst firing) का केला नाही?
५) आणि सर्वात विशेष म्हणजे त्या खतरनाक अतिरेक्यांनी सदानंद दातेंना का मारले नाही?

          एकंदरीत सर्व बाबींचा विचार केला असता असे दिसते की, सदानंद दाते या कटात सामील होते. व कामा हॉस्पिटलच्या टेरेसवरील अतिरेकीही त्याच कटाशी संबंधीत होते. आपल्या बरोबरच्या इतर अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी अतिरेक्यांना मारू नये म्हणून दातेंनी सर्वांना खाली पाठविले होते. त्यांनी जाणून बुजून अतिरेक्यांना मारले नाही व ते निघून गेले असे खोटे सांगितले. नंतरच्या घटनांवरून असे दिसून येते की, सदानंद दाते यांनी अतिरेक्यांना हॉस्पिटलमधील एखाद्या खोलीत सुरक्षित ठेवले असावे. परंतु नंतर त्यांना कोणीतरी ओळखल्यामुळे त्यांनी अचानक गोळीबार सुरू केला व हॉस्पिटलमधील रूग्णांना ओलीस ठेवले.

एन्.डी.टी.व्ही, स्टार न्यूज, आज-तक, आय्.बी.एन७, झी न्यूज, टाइम्स टी.व्ही. यांचे त्या रात्रीचे फूटेज पाहीले असता कामा हॉस्पिटल येथे रात्री १.३० ते पहाटे ५ पर्यंत युध्दजन्य परिस्थिती होती असे दिसून येते. “हॉस्पिटलचा चौथा मजला व टेरेस येथून अतिरेकी गोळीबार करीत आहेत”; “या अतिरेक्यांनी हॉस्पिटलच्या पेशंटना ओलीस ठेवले आहे”; “पोलीसांनी हॉस्पिटलची संपूर्ण नाकेबंदी केली आहे”; “दोन पेशंटना अतिरेक्यांनी ठार केले आहे”; “पोलीस अधिकारी अतिरेक्यांशी चर्चा करीत आहेत”; “कमांडोनी कामा हॉस्पिटलला घेरले आहे”; “कमांडो व अतिरेकी यांचेमध्ये गोळीबार सुरू आहे” वगैरे बातम्या वेगवेगळ्या टी.व्ही चॅनलवरून सतत देण्यात येत होत्या. पहाटे ५ वाजता “कामा हॉस्पिटल येथिल कारवाई संपली अशी अखेरची बातमी एन्.डी.टी.व्ही ने दिली. (हे टीव्ही फुटेज पाहण्यासाठी शिर्षकाच्या वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा)

       पण या इतक्या महत्वाच्या घटनेचा थोडाही उल्लेख चार्जशीटमध्ये नाही. यावरून पोलीसांना काही बाबी लपवायच्या होत्या हे स्पष्ट होते. या सर्व घटनेचा एकत्रित विचार केला तर असे दिसून येते की, सदानंद दाते यांनी जे अतिरेकी कामा हॉस्पिटलमध्ये लपवून ठेवले होते व ज्यांनी आपली ओळख पटल्यामुळे गोळीबार सुरू केला ते कमांडो कारवाईत मारले गेले किंवा पकडले गेले. पण ते ब्राह्मण्यवादी संघटनांचे असल्यामुळे त्यांची नावे कळू नयेत म्हणून ही संपूर्ण घटनाच पोलीस रेकॉर्डवरून पुसून टाकली.  या कर्तृत्वाचे बक्षीस म्हणून सदानंद दातेना एन आय ए या देशातील सर्वात महत्वाच्या तपासणी यंत्रणेचे प्रमुख बनविण्यात आले आहे. 

        ( मुंबई हल्ल्यासंबधीचे दुसरे पुस्तक "26/11 Probe: Why Judiciary Also Failed" या पुस्तकातील सदानंद दाते यांच्या संबंधीचे संदर्भ )

  • एस एम मुश्रीफ 
  • आय पी एस (निवृत्त)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com