Top Post Ad

राज्यातील शासकीय रुग्णालयातील अधीपरीचारिकाच्या बेमुदत धरणे आंदोलनाला सुरूवात


  महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपरिचारिकांनी बेमुदत धरणे आंदोलन करून प्रलंबित असलेली पाठयनिरदेशिका ट्युटर ची पदोन्नती त्वरीत देण्याच्या मागणीसाठी राज्यातील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या अधीपरीचारिकानी मोठ्या संख्येने दि.10 सोमवार पासून मुंबई येथील आझाद मैदानावर त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरूवात केली असून राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या  हजारपेक्षा जास्त परिचारिकांनी पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केला आहे,२००७ पासून सेवांतर्गत पी.बी.बीएससी.उत्तीर्ण झालेल्या राज्यातील  कोणत्याही अधीपरीचारिकाना  नियमात तरतूद असतानाही अजूनपर्यंत एकाही परिचारिकेला पदोन्नती दिली नाही.

2007 पासून आज पर्यंत सेवा अंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांना डावलण्यात आले आहे आणि अन्यायाची परिसीमा झालेली आहे वीस ते पंचवीस वर्षाची सेवा देऊनही सेवा अंतर्गत पी बी बी एस सी केलेल्या उमेदवारांना पदोन्नती देण्यात आलेली नाही ,

त्यांच्या अनुभवाचा उपयोग  करून घेण्यात आलेला नाही. याउलट इंडियन नर्सिंग कौन्सिल आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांच्या  मार्गदर्शक  सूचनांना डावलून महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सरळ सेवेची भरती केलेली आहे 1964 च्या सेवा प्रवेश नियम व 2021 च्या सेवा प्रवेश असे वेगवेगळे सेवा प्रवेश नियम लावून सरळ सेवा भरती केलेली आहे   आधीपरिचारिका या पदावर रुजू झाल्यानंतर  आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयामध्ये दोन वर्षाचा डिग्री कोर्स पूर्ण केला आहे 

शासन सेवेमध्ये त्यांनी शासनाला वीस ते पंचवीस वर्ष सेवा  देऊनही त्यांना  पदोन्नती न देऊन त्यांच्यावर अन्याय केलेला आहे याबाबत 2007 पासून 2021 पर्यंत रिक्रुटमेंट रुल्स (आर आर) तयार  करण्यात आले आणि नवीन आर आर जे तयार झाले  ते आंदोलनकर्त्यांवर अन्यायकारक असे आहेत त्यामुळे पाठ्यनिर्देशिका पद (ट्यूटर ) पदोन्नतीने भरण्यात आलेले नाही हा अन्याय दूर करण्याकरिता अनेक वेळा शासनास सार्वजनिक आरोग्य विभागास पाठपुरावा केला. अनेकदा आंदोलने केली. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही त्यामुळे  आंदोलनकर्त्यांवर बेमुदत  धरणे आंदोलनाची वेळ आली आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील अधीपरीचरिका आपल्या कुटुंबातील लहान मुलांसह  मुंबईत दाखल झाल्या आहेत.

-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com