Top Post Ad

पोलीस दलाला 'कृत्रिम बुद्धिमत्ते' (एआय) ची जोड

पोलीस दलाला 'कृत्रिम बुद्धिमत्ते' (एआय) ची जोड मिळाल्याने मशीनला माहितीचे विश्लेषण करून नागपूर : आणि मानवाप्रमाणे विचार करायला शिकवून गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तसेच होणारे गुन्हे रोखण्यासाठी मोठा लाभ होऊ शकेल. त्यासाठीच महाराष्ट्र पोलिसांकडे एआयचे 'मार्वल' हे अस्त्र देण्यात आल्याची माहिती नागपूर जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी शनिवारी एका कार्यक्रमातील सत्रात दिली. भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) नागपूरमध्ये दोन दिवसापासून विश्वमंथन रिसर्च फाउंडेशनतर्फे 'एआय'वर मंथन सुरू आहे. शनिवारी त्याअंतर्गत आयोजित एका पॅनल चर्चेत हर्ष पोद्दार व साई क्रिष्णा हे सहभागी होते. हर्ष पोतदार यांनी सांगितले, पोलीस दलाकडे गुन्हे आणि गुन्हेगारांसंबंधी माहिती मोठ्या प्रमाणावर येत असते. सायबर आणि आर्थिक स्वरुपाच्या गुन्ह्यांच्या संख्येतही मोठी वाढ होत असून नागरिकांच्या फसवणुकीचे नवनवीन मार्ग अवलंबिले जात आहेत. यात गुन्ह्यांचे प्रकार आणि गुन्हेगारांची संख्या देखील मोठी असते.

प्रत्येक बाबीत विविध प्रकारे मानवी मेंदूच्या क्षमतेचा वापर करून आणि उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून गुन्ह्यांची उकल करण्याचा प्रयत्न केला जातो. तथापि या माहितीचा वापर करून विश्लेषण करायला आणि मनुष्याप्रमाणे निर्णय घ्यायला आधुनिक संगणकालाच शिकविले तर याचा मोठा लाभ होऊ शकतो. हाच धागा पकडून महाराष्ट्र पोलीस दलात एआयचा वापर करण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करुन पोलीस दलाला या कृत्रिम बुद्धीमत्तेची मदत मिळवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्या अनुषंगाने महाराष्ट्र रिसर्च अॅण्ड व्हिजिलन्स फॉर एनहान्स्ड लॉ एनफोर्समेंट (मार्वल) ची स्थापना करण्यात आली. याद्वारे गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत जाणून, उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून कुठे गुन्हा घड्डू शकतो, कुठे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते आदी बाबींचे अनुमान आधीच लावता येऊ शकणार, असा विश्वास हर्ष पोद्दार यांनी व्यक्त केला.

आयआयएम नागपूर येथे मार्वलचे कार्यालय असेल तर नागपूरचे पोलीस अधिक्षक व आयआयएमचे संचालक याचे पदसिद्ध संचालक व एआय तंत्रज्ञान पुरविणारी 'पिनाका' कंपनीचे संचालक मार्वलच्या संचालक मंडळावर असतील. पोलीस अधिक्षक हे या संस्थेचे सीईओदेखील आहेत. 'मार्वल' थेट शासनाच्या गृह विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असणार आहे. त्यामुळे भविष्यात शासनाच्या इतर विभागांनाही कृत्रिम बुद्धीमत्तेचा लाभ मिळेल, अशी माहिती हर्ष पोद्दार यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com