- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
- वय 21 ते 60 वर्षे
- दरमहा 1500 रुपये मिळणार
- दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
- अंमलबजावणी : 1 जुलै 2024 पासून ➡️ शेवट तारीख 15 जुलै 2024
- पात्रता पहा
- महाराष्ट्र रहिवासी
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
- 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
- अपात्र कोण असेल
- 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
- घरात कोणी Tax भरत असेल तर
- कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
- कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
- कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )
- लागणारी कागदपत्रे
- आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्न दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , फोटो
महिलांसाठी बजेट मंजुरीच्या अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. त्याला १५ दिवसाची मुदत दिली. सर्व ग्रामपंचायत,तलाठी, तहसील कार्यालयात गर्दि झाली. पंधरा दिवसात हे काम होणारच नव्हते हे सरकारला माहित होते. गर्दीने योजनेची पर्यायाने सरकारची प्रसिद्धी होत आहे. आता सरकारने दोन महिने मुदत वाढवली ३१ ऑगष्ट पर्यंत अर्ज करण्याची. नंतर अर्जाची छाणनी सुरू होणार. छाणणी सुरू असतांनाच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता. मग आम्हाला निवडुन दिले तर आम्ही योजना राबवु नाही तर नाही.दुसरे सरकार बघुन घेईल. समजा दुसरे सरकार आले तर त्याला योजनाच राबवता येऊ नये अशी तरतूद केली. कशी तर पहा, महिलांना दरमहा १५००/-रुपये देणार. महाराष्ट्राची लोकसंख्या आहे अंदाजे १२ कोटी. त्यात ६ कोटी महिला त्यातील ३ कोटी अपात्र ठरल्या तरी ३ कोटी महिलांना दरमहा १५००/- रुपये द्यायचे म्हटलं तर ४५०००,०००,००० एवढी रक्कम दरमहा वाटणार. वर्षाला किती ते तुम्हीच गणीत करा. एवढी रकमेची तरतूद तरी केली आहे का बजेट मधे. केली असेल तर दरमहा सरकार कुठुन आणणार आहे एवढी रक्कम. उत्पन्न किती खर्च किती. नविन येणारे सरकारला भिक मागावी लागेल. ते देऊ शकणार नाही. पर्यायाने बदनाम होईल व अल्पावधीतच सरकार जाईल व ते सरकार नालायक होते आता पुन्हा आम्हालाच निवडुन द्या म्हणनार व पुन्हा आपल्या बोकांडी हेच येणार पहिल्या कॅबिनेट वाले.
घरातले सर्व लोक प्रायव्हेट नोक-या मजुरी करून देखील घरचे भागत नाही.आर्थिक चंचन,सावकारी कर्जाचा बोजा हा डोक्यावर आसतोच.बेरोजगारी,महागाई,गरीबी हटवीण्यास अपयशी ठरलेले महाराष्ट्राचे राज्य सरकार आज अपयश लपवीण्या साठी लाडकी बहीणच्या नावाने महीलांना भावनीक करून वोट बॅंक निर्माण करीत आहेत.यात नुकसान राज्याचेच आहे.नोकरदार महीलांना घर कामगार महीला उपलब्ध होणार नाहीत कींवा महाग जाणार आहेत.नोकरदार वर्ग, व्यावसायिकांच्या घरच्या कामांच्या नित्यक्रमाची रूपरेषाच बदलणार ज्याचा प्रचंड असर त्यांच्या मुलांच्या शिक्षण व खाद्य्य स्वास्थ्यावर होणार आहे.शेत मंजूर महीलांचे दर वाढून (अमूक मजूरी दे नाहीतर मी उपाशी राहातं नाही.सरकार मला दरमहा पोसतय) शेती निर्मीती व शेती व्यावसायावर प्रचंड दुष्परीनाम होणार आहे.
तसेच कीरकोळ मालाच्या विक्रेत्या,शेत मजूरी करणा-या महीला,फेरीवाल्या महीला सुस्त होऊन त्यांच्या रोजगारा कडे फीरकणार नाहीत.ज्या मुळे अर्थ व्यवस्थेचे संपुर्ण स्ट्रक्चर कोलमडणार आहे.सरकार महीलांना काही न करता दरमहा १५०० देऊन पोसणार म्हणजे कौटूंबीक कलह बहूसंखेने निर्माण होणार हे देखील तीतकेच खरे व घातक आहे.ना बहीण सख्या भावाची राहणार.ना मुलगी बापाची,आईची,ना नव-याची राहणार.अर्थ व्यवस्था चालणारे मणूष्य बळ या पासून अर्धे झाल्या मुळे महागाई आधीक वेग घेणारे आहे.फक्त निराधार,विधवा,अपंग,अर्थहीन घटस्पोटीत,दुर्धर आजाराने रूग्न महीलांच्या हिता साठी जर ही रक्कम डबल करून दिली तर आशिर्वादा सहीत राज्याचे आर्थिक,सामाजीक,शैक्षणीक,राजकीय स्वास्थ ही सबळ राहील. कृपया योजनेचा फेर विचार करावा अन्यथा ज्या वर्गास,ज्या व्यक्तीस अथवा समाज घटकांना याचा उपद्रव होईल ते सुज्ञ नागरीकांचे योजनाधा-यांच्या विरोधात जनमत गेल्या शिवाय राहणार नाही....अरुणा नारायण (अहमदनगर)
आदरणीय एकनाथ (दादा )शिंदे
मुख्यमंत्री -महाराष्ट्र राज्य
पत्र लिहण्यास कारण की, तू सुरू केलीली *लाडकी बहीण माझी* या योजने अंतर्गत आम्हाला तू महिना 1500/- रुपये देणार आहेस. पण दादा हे पैसे आम्हाला नको. याबद्दल तू ... गॅस चे दर कमी कर, विजेचा दर कमी कर, चांगले रस्ते तयार कर, ट्रॅफिकची समस्या सोडण्याचा प्रयत्न कर जेणे करून तुझ्या भाओजीनां पैशाची चणचण लागणार नाही. त्यांच्या कमी पगारात, कमाईत पण तुझी बहीण सुखी राहील.
दादा, आणखी एक विनंती करते.. तुझ्या लाडक्या भाचा -भाची ची शाळेची फी पण कमी करता येते का बघ. जेणे करून त्याला चांगले उच्च शिक्षण सुद्धा घेता येईल. आणि हो त्याच्या बेरोजगारीचा प्रश्नही लवकर सोडव...
दादा.. आम्हाला 1500 रु खरंच नको देऊ. पण आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या जरूर दे.
- तूझी लाडकी बहीण....
- अरुणा नारायण (अहमदनगर)
0 टिप्पण्या