Top Post Ad

तमाम कामगारांसाठी... फ्रान्समधील चौथ्या क्रांतीचं मर्म

 तमाम कामगारांसाठी... फ्रान्समधील चौथ्या क्रांतीचं मर्म (क्रांती-वर्षे...१७८९, १८३०, १८४८ आणि २०२४)

ज्या फ्रेंच-राज्यक्रांतीनंतरच, संसदेत बसण्याच्या व्यवस्थेतून 'डावे' (साम्यवादी-समाजवादी गट) आणि 'उजवे' (भांडवलवादी गट) अशा दोन परस्परविरोधी विचारसरणीच्या लोकांचं विभाजन जगभरात रूढ झालं...त्याच फ्रान्समधे, नुकत्याच पार पडलेल्या 'फ्रेंच नॅशनल ॲसेंब्ली'च्या सार्वत्रिक-निवडणुकीत डाव्यांना मोठा ऐतिहासिक विजय मिळालाय... आणि, तो विजय म्हणजे जणू, युरोप-अमेरिकेसारख्या भांडवलप्रधान राष्ट्रांमधल्या बदलत्या सामाजिक व राजकीय वातावरणाची नांदीच होय!  यंदाच्या फ्रान्समधील निवडणुकीत 'न्यू पाॅप्युलर फ्रंट' (NFP) या डाव्या-आघाडीला, ५७७ संसद-सदस्यांच्या सभागृहात सर्वात जास्त; म्हणजे, १८२ जागा मिळाल्या...राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्राॅन यांच्या 'एन्सेंबल आघाडी'ला १६३ तर, ज्यांच्या संभाव्य विजयाच्या मोठ्या बाता मारल्या जात होत्या, त्या अतिरेकी उजव्या विचारसरणीच्या 'मेरीन ली पेन' यांच्या 'नॅशनल रॅली' (RN) आघाडीला (आपल्याकडच्या 'चार सौ पार'चा पोकळ नारा देणाऱ्या 'NDA' सारखीच असणारी) फक्त, १४३ जागा मिळाल्या! सोशालिस्ट पार्टीतून फुटून निघत, स्वतःचा 'पॅलेस्टाईन-समर्थक', कडव्या डाव्या विचारसरणीच्या 'फ्रान्स अन्बाऊड पार्टी'ची (LFI) स्थापना करणाऱ्या 'जीन-लुक मेलाॅशाँ' यांनी NFP या डाव्या व निसर्ग-पर्यावरणवादी 'हरित' (Green Party) अशा, चार-पक्षांच्या आघाडीत सर्वात जास्त जागा पटकावल्या असून त्यांच्या धोरणसूचीत अग्रक्रमाने.... 

१) फ्रेंच किमान-वेतन दरमहा १६०० युरो करण्याचं अभिवचन आहे...म्हणजे, भारतीय चलनात प्रतिमाह रु.१,४५,०००/- इतकं करण्याचं प्रस्तावित आहे, जेव्हा, भारतातलं औद्योगिक-सेवा क्षेत्रातील किमान-वेतन धड 'पाच आकडी' म्हणजे, रु.१०,००० (दहा हजार रु.) देखील नाही! म्हणजेच, यापुढे LFI पक्षाच्या मेलाॅशाँ यांच्या विजयामुळे, 'फ्रेंच किमान-वेतन' हे, सर्वसाधारण 'भारतीय किमान-वेतनाच्या जवळपास १५ पटी'ने जास्त असणार आहे!*
२) वीज, गॅस व इतर जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीना वाजवी अशी 'अधिकतम-मर्यादा' (Ceiling) निश्चित केली जाणार आहे, ज्यामुळे भारतात जशी सामान्य भारतीय-नागरिक महागाईच्या आगीत पोळून निघतायत त्यातला प्रकार होणार नाही (इथले 'अंधभक्त' व त्या अंधभक्तांचे भाजपाई-संघीय नेते मंडळी...महागाई, बेरोजगार-अर्धरोजगारीसारख्या जीवनमरणाच्या मुद्द्यांना 'गौण' ठरवत...डातधर्मविद्वेषी प्रचाराला, भंपक राष्ट्रवादाला व दांभिक 'हिंदुत्वा'ला पुढावा देण्याची बदमाषी करत जनतेला 'मूर्ख' बनवतायत; तसेच, लोकशाहीसंस्था बेकायदेशीररित्या व बळजबरीने ताब्यात घेऊन राज्यकारभार करु पहातायत)
३) मेक्राॅन-सरकारने जबरदस्तीने लागू केलेल्या नव्या 'कामगार-कर्मचारीविरोधी 'निवृत्तीवेतन-योजने'ला (New 'Anti-Labour'  Pension-Scheme) ज्यात निवृत्तीचं वय ६२ वरुन ६४ करण्यात आलं होतं, ती रद्द करुन पुर्वीप्रमाणेच जुनी कामगारहितैषी 'निवृत्तीवेतन-योजना' लागू केली जाणार आहे.
४) निसर्ग-पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी 'कार्बन-ऊत्सर्जन' कमीत कमी राखून... 'कल्याणकारी-राज्य' संकल्पनेअंतर्गत सावर्जनिक शिक्षण-आरोग्य, महिला-बालविकासासारख्या योजनांवर सरकारी खर्चाचा भर असणार आहे.

राजन राजे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com