Top Post Ad

गरीबांच्या घरांसाठी मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सहाय्य...४०० कोटीचा प्रकल्प चड्डा ग्रुप पुर्ण करणार


  चड्डा डेव्हलपर्स आणि प्रमोटेर्स एमएमआर प्रदेश वांगणी, जिल्हा ठाणे, मुंबई, महाराष्ट्र येथे गरीब लोकांसाठी २६२०० इडब्लूएस घरे बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पातून १.२५००० गरीब लोकांना घरे मिळणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना आवास योजनेतून मागील २ वर्षात गरजू कुटुंबांसाठी ५००० घरे आधीच बुक करण्यात आली आहेत. मात्र कोविड महामारीमुळे या ५००० कुटुंबांना मोठी आर्थिक समस्या आली. या काळात ते बँकेचे हप्ते वेळेवर (इएमआय) भरू शकले नाहीत. त्यामुळे सिबिल स्कोअर कमी झाला. यामुळे ग्राहकांचे बँकेकडून गृहकर्ज मंजूर होत नाही. ही कुटुंबे एकाच वेळी भाडे किंवा ईएमआय देऊ शकत नाहीत. एकाच वेळी दोन देयके भरणे खूप कठीण आहे. या सर्व परिस्थितीचे गांभीर्य ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताबडतोब या २५००० लोकांपर्यंत या इडब्लूएस घरांचा वेळेवर ताबा देण्याचा निर्णय घेतला, आणि हे बांधकाम वेळेवर करण्याचे आश्वासन चड्डा ग्रूपने दिले असल्याचे चड्डा ग्रुपचे प्रमुख चड्डा यांनी आज स्पष्ट केले. आपल्या या प्रकल्पाविषयी माहिती देण्याकरिता मुंबईतील प्रेस क्लब येथे प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. 

चड्डा ग्रुप २००२ पासून रिअल इस्टेट व्यवसायात आहे, त्यांची पंजाब आणि दिल्लीमध्ये मजबूत भरीव कामगिरी केलेली आहे. हा प्रकल्प पूर्णपणे स्वयंपूर्ण आहे. बँकेचे कोणतेही कर्ज नाही आणि किवा दिवाळखोरी नाही. या गणेश चतुर्थीच्या सणात 1000 फ्लॅट्स, त्यानंतर डिसेंबरमध्ये आणखी असे एकूण 4114 फ्लॅट्स सुपूर्द करू. प्रत्येक गरीबाचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करणे हाच या प्रकल्पाचा एकमेव उद्देश आहे. हा प्रकल्पा अंतिम मुदतीनुसार मार्च 2026 पर्यंत पूर्ण होईल. 2024 पर्यंत सुरुवातीच्या 4194 फ्लॅट्सचा ताबा अंतिम मुदतीच्या दोन वर्षे आधी देण्याचे उद्दिष्ट आहे. इतकेच नाही तर या गरीब लोकांकडून उशीरा पेमेंटवर एक पैसाही व्याज किंवा दंड आकारत नाही. मुंबईतील एमएमआर क्षेत्रामध्ये एकमेव विकासक आहोत जे केवळ 100% गरीब लोकांसाठी सर्वात कमी खर्चात घरे बांधत असल्याचा दावाही चड्डा यांनी केला. मात्र या पद्धतीनुसार स्थानिक बिल्डर्स त्यांच्या जास्त किमतीच्या प्रकल्पातील फ्लॅट कमी किमतीत विकू शकत नाहीत. म्हणून अशा सर्व विकासक आणि बिल्डरांनी एकत्र येऊन चड्डा ग्रुपची बदनामी करण्याचा कट रचत आहेत. कारण गरीबांना घरे मिळावीत असे त्यांना वाटत नाही. इतकेच नाही तर मला मारण्याची धमकीही देण्यात आली असून या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली असल्याचेही चड्डा यांनी सांगितले. कोणी कितीही काही अडथळे निर्माण केले तरी हा प्रोजेक्ट आम्ही करणारच कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तो गरीबांसाठी आहे म्हणूनच चड्डा बिल्डर हा प्रोजेक्ट करणार असल्याचा ठाम विश्वास चड्डा यांनी यावेळी व्यक्त केला. 


 या अत्याधुनिक टाऊनशिपमध्ये एकूण ८२२८ फ्लॅट निर्माण होणार आहेत. १३३ टॉवर्स, G+७ मजले, आणि प्रत्येक इमारतींना २४ तास पाणी पाणीपुरवठा, वीजपुरवठा, ओपन एअर जिम आणि इनडोअर जिम, क्लब हाऊस, स्विमिंग पूल, मुलांसाठी खेळण्याची जागा यासारख्या ५०+ सुविधा आहेत. योग कक्ष, बॅडमिंटन कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, बॉक्स क्रिकेट खेळपट्टी, जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी बाकडे, तसेच सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, पॉवर बँक-अप, हॉस्पिटल, सोसायटी ऑफिस, ५ कमर्शियल मॉल, २० गार्डन्स, शाळा, मार्केट आणि मंदिर यांचा समावेश असेल. चड्डा ग्रुप २००२ पासून रिअल इस्टेट व्यवसायात आहे, त्यांची पंजाब आणि दिल्लीमध्ये मजबूत भरीव कामगिरी केलेली आहे. त्यांनी म्हाडाकडे १००० युनिट्स ओसीसाठी अर्ज केला आहे.  गरीब लोकांना वेळेवर घरे तयार करण्यासाठी बीज भांडवल दिले जाते. सोलापुरातील रे नगर प्रकल्पाला बीज भांडवल देण्यात आले आणि त्यानंतर बिल्डरने १५००० घरे यशस्वीपणे दिली. या प्रकल्पासाठी मंजूर झालेले हे बीज भांडवल बांधकाम जोडलेल्या योजनेवर ८ समान हप्त्यांसह वितरित केले जाईल. आमचा पूर्ण प्रकल्प जमिनीसह महाराष्ट्र सरकारकडे गहाण ठेवला जाईल. आणि म्हाडाकडून आमच्या एस्क्रो खात्याद्वारे रक्कम थेट परतफेड केली जाईल. हे पैसे गरिबांना त्याचं स्वतःच हक्काचं घर बनवण्यासाठी दिले जात  असल्याचे चड्डा यांनी स्पष्ट केले. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com