Top Post Ad

दिव्यांगांना मिळणार दर सहा महिन्यांनी ६ ते १८ हजार रुपयांचे अर्थसहाय्य


  दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे ४० ते ८० टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी 'धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य' योजनेतंर्गत एक रकमी अर्थसहाय्य करण्यात येत आहे. सन २०२४-२५ ते सन २०२८-२९ या पाच वर्षांच्या कालावधीकरिता या योजने अंतर्गत दरमहा एक ते तीन हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे. पुढील पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत सुमारे ६० हजार दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी दरवर्षी १११.८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका कार्य क्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरुपी रहिवासी असलेल्या दृष्टी नसलेले, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व इतर प्रकारचे शारीरिक व्यंगत्व आलेल्या दिव्यांग व्यक्तींना सामान्य जीवन जगता यावे, योग्य औषधोपचार व आहार घेता यावा व व्यंगत्वामुळे अर्थार्जन आणि जीवनमान सुधारणांची संधी गमावल्यामुळे आलेले परालंबित्व कमी व्हावे, यासाठी 'धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना' सुरू करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.  

या योजने अंतर्गत वय वर्ष १८ वरील ४० टक्के दिव्यंगत्व आलेल्या व्यक्तींना दरमहा एक हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित सहा हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल. म्हणजेच वार्षिक १२ हजार रुपये मिळतील. तसेच ८० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दरमहा तीन हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित १८ हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल. म्हणजेच वार्षिक ३६ हजार रुपये मिळतील. या दोन्ही गटातील दिव्यांगांना पुढील पाच वर्षांकरिता हा लाभ मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र (UIAD CARD) असणे आवश्यक आहे. 

या योजने अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरुपी रहिवाशी असलेल्या दिव्यांगांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेसाठी पात्रतेचे निकष, योजनेच्या अर्टी, शर्ती, आवश्यक कागदपत्रे व अर्जाचा नमुना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in येथे About BMC – Departments - Department Manuals-Assistant Commissioner Planning-Docs- दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना (सन २०२४-२५ ते सन २०२८-२९)’ यावर क्लिक केल्यास तेथे अर्जाचा नमुना उपलब्ध होईल. सदर योजनेचे अर्ज भरण्यास अंतिम मुदत नाही. सर्व कागदपत्रांसहित पूर्ण भरलेले अर्ज सर्व संबंधित विभाग कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत जमा करावेत, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे. 


---------------------------------------------------------------------

 ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर

 ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना जाहिर झाल्या आहे. या योजनेसाठी प्रभागसमितीनिहाय अर्जाचे वितरण सुरू असून 23 ऑगस्ट 2024 पर्यत अर्ज वितरीत केले जाणार आहेत. तर दिनांक 25 जुलै ते 26 ऑगस्ट 2024 या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येतील. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्ती, मुले, महिला यांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

           ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागातील दिव्यांग कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब व आर्थिक दुर्बल घटकातील दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी दरवर्षी विविध योजना राबविण्यात येतात. सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योजनांमध्ये 'दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती', 'दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती', 'दिव्यांग व्यक्ती / विद्यार्थी यांना जिल्हास्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती', 'दिव्यांग व्यक्ती / विद्यार्थी यांना राज्यस्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती', 'दिव्यांग व्यक्ती / विद्यार्थी यांना राष्ट्रीयस्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती', 'दिव्यांग व्यक्ती / विद्यार्थी यांना आंतरराष्ट्रीयस्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती', 'दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह करण्याकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (NEFT/RTGS/ECS) द्वारे जमा करणे', 'दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (NEFT/RTGS/ECS) द्वारे जमा करणे', 'दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग सहाय्यभूत साहित्य खरेदी करणेकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (NEFT/RTGS/ECS) द्वारे जमा करणे', 'दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय खर्चाकरिता निधी उपलब्ध करुन देणे', 'दिव्यांग बेरोजगारांना भत्ता / अर्थसहाय्य देणे', 'दिव्यांग व्यक्तींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करणे', '60 वर्षावरील दिव्यांगाना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे', 'दिव्यांग व्यक्तींच्या बचतगटांना अर्थसहाय्य देणे', 'कुष्ठरुग्णांना उदरनिर्वाहासाठी अनुदान देणे', 'निरामय आरोग्य विमा योजनेची कार्यवाही करणे (गतिमंद, आत्ममग्नता, मेंदूचा पक्षाघात झालेली व्यक्ती व बहुविकलांग व्यक्ती यांचेकरिता)' या विविध योजनांचा समावेश आहे. या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकडे किमान 40 % दिव्यांग असल्याबाबतचा दाखला असणे आवश्यक आहे.   सदर योजनांचे अर्ज ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभागसमिती कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील. दिनांक 24 जुलै ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत अर्जांचे वितरण केले जाईल. तर दिनांक 25 जुलै ते 26 ऑगस्ट 2024 या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com