नको देवराया अंत असा पाहू...
असं सुंदरस गाण आहे. त्या गाण्याचा शोध आणि बोध सरकारने ध्यावा. कारण देवासमान तुम्हांकडे जनता आशेने पाहते आहे. तुमच्याकडे अपेक्षेने पाहते आहे. आता तरी तुम्ही जागे व्हाल... आता तरी तुम्हांला दया येईल. आता तरी तुमच्या कडून न्याय मिळेल. आता तरी आमच्या घरादाराचा, नोकरीधंदयांचा, आरोग्याचा, शिक्षणाचा, अन्नपाण्याचा, वस्त्र निवाऱ्याचा, संरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल या आशेने तुमच्याकडे पाहते आहे. ह्याच आशेने तुम्हांला निवडणुकामध्ये निवडून दिले. आणि आता तुम्ही तर माज आल्यासारखा आमच्या मुळावर उठलात आहे. आम्हांला स्मशानात घालण्याचा घाट घालीत आहात. आमची क्षणोक्षणी, तीळ तीळ करून हत्या करीत आहात. आमच्या जीवनाशी खेळत आहात. आमच्या आया बहिणींच्या, मुलाबाळांच्या आयुष्याशी खेळत आहात. त्यांच्या आयुष्याचे मातेरे करीत आहात. परंतु तुम्हांला येणारी पिढी माफ करणार नाहीच, नाही. सध्याचीच पिढी पेटून उठेल. तुम्हांला जाब . विचारल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला पळवून पळवून तुमचा घाम काढतील. तुम्हाला उघडेनागडे करतील. तुमची मस्ती, तुमचा माज उतरवतील. तुमच्या ही आयुष्याचे मातेरे करतील म्हणून तुम्ही माजू नका. कारण इतिहास साक्षी आहे, ज्या ज्या सत्ताधीशांनी माज केला ,त्यांनी मस्ती केली. त्यांचा माज जनतेने मोडून काढला, टाकला. तुमचाही माज, मस्ती उतरविण्याची वेळ आली आहे. आणि ज्या जनतेने तुम्हांला सोन्याचा मुकूट बहाल केला .तुम्ही त्या जनतेला काटे बहाल करीत आहात. त्यांना काटे देत आहात. नुसत्या आश्वासनाची खैरात वाटत आहात ही दंडेलशाही, दडपशाही चांगली नाही. तुम्ही सत्ता भोगता ना । मग, हा माज का? तुमचा माज मोडण्यासाठी जनता तयार आहे. ह्या, तमाम जनतेला आवाहन करावेसे वाटते कि, वेळीच जागे व्हा. अन्यथा काही खरे नाही. कारण सारे उध्वस्त झाल्यावर जागे झाले तर आपल्यासारखे महामूर्ख कुणी नाही. हा माझ्या पक्षाचा, तो त्या पक्षाचा, मी ह्या पक्षाचा करीत राहिलो तर आपले वाटोळे हे निश्चितच आहे.
देशाच्या गुलामीला 150 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. तो इतिहास पुसण्याचा सोडून, देशाचा विकास करण्याचा सोडून, समाजाचा विकास करण्याचा सोडून ,जनतेची लयलूट करीत आहात. जनतेला उघडे नागडे करीत आहात. हे लुटमारीचे सत्र कुठे तरी थांबविण्याची गरज आहे.पण जनतेची अन्न, वस्त्र,निवारा, आरोग्य, शिक्षण, संरक्षण आदी मुलभूत गरजा भागविण्याचे सोडून त्यांची मुस्कटदाबी ,पिळवणूक करून, भांडवलदारांना जनतेचा आणि जनतेच्या संपत्तीचा लिलाव केला ? जनतेला त्यांच्या हाती विकून टाकले ? आणि त्याचमुळे विद्युत बिलाची रक्कम अदा करताना जनतेच्या नाकी नऊ येते आहे. घर, शिक्षण, लग्न, आरोग्य, शेती आदीसाठी कर्ज घेतले तर फेडता येत नाही. अगदी सर्व स्तरावर कोंडी केली गेली आहे, जाते आहे. आणि त्याचमुळे दलितांचा निधी राजरोसपणे कित्येक वर्षे अन्य ठिकाणी वळवला गेला. वळवला जात आहे .मग, त्या बार्टीच्या विद्यार्थ्यांना न्याय न देता उघडउघड त्यांचेवर अन्याय करून महाज्योती, सारथी च्या विदयार्थ्यांना दलितांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेला निधी ह्या विद्यार्थ्यांना देण्यात आला. आणि ह्या विद्यार्थ्यामध्ये विषमतेचे विष पेरण्याचे काम मस्तवालपणे केले गेले आहे. तरी ह्या पीएचडीधारक संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशीप देण्यासाठी सरकार नुसती बघ्याची भूमिका घेत आहे. आणि कोण तो समाज खात्याचा अड्डेलतटटू सचिव आहे त्याने तर कुठला तरी जावईशोध लावून अनुसुचित जाती जमाती विद्यार्थ्यांची पुरती वाट लावायची असा विडा उचलून महाज्योती, सारथी च्या विद्यार्थ्याची ही वाट लावली आहे. मग, मराठा, ओबीसी, दलित, बौद्ध समाजाचे नेते, कार्यकर्ते विद्यार्थ्याचे बळी गेल्यावर जागे होणार का? हा खरा प्रश्न निर्माण होतो. कारण पुणे येथून निघालेला विद्यार्थ्यांचा लॉग मार्च आझाद मैदान मुंबई येथे येऊन पोहचला आहे तरी त्यांची दरवल कुणीच घेत नाही. हीच वेळ तुमच्या मुलांवर आली असती. तर तुम्ही काय केले असते. असे अनेक प्रश्न आझाद मैदानावर उपोषण, मोर्चे, आंदोलनेद्वारे सरकारला विचारले जाते आहे. परंतु सरकार आणि सरकारची आयएएस, आयपीएस आदी तज्ञमंडळी मजा पाहता आहेत. हे चांगले लक्षण नाही. कारण वजीर, प्रहार , क्रांतीवीर आदी सारखे चित्रपट जनतेला प्रेरणा देणारे आहे. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचे बलिदान, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, मौलाना आझाद आदीसारख्या नेत्यांचे समर्पण ,शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज आदी सारखे आदर्शवत राजे महाराजांची, संत महंतांची, महामातांची , महामानवांची भूमी आहे. इथे तुमच्या पापाला नव्हें महामापाला माफी नाहीच नाही. म्हणूनच कॉग्रेस पक्षाने तुमच्या पापाचा महापापाचा पंचनामा केला आहे तो पंचनामा खरा आहे काय? खोटा आहे ? हे तुम्हाला बेंबीच्या देठापासून ओरडून सांगावे लागेल. मग, कॉग्रेसने तुमच्या पापाचा महापापाचा पंचनामा केला तो असा-
इथे तमाम जनतेच्या , भारतीयवासियांच्या वतीने सांगण्याचे तात्पर्य असे की, सत्ता कुणीही भोगा. मग, ती कॉग्रेस पक्षाने म्हणा, भाजपाने म्हणा, कम्युनिस्ट पक्षाने म्हणा, सेनेने म्हणा, रिपाईने म्हणा, बसपाने म्हणा वा अन्य पक्षाने म्हणा, जनतेची लुटमारी करता कामा नये. जनतेचे शोषण करता कामा नये. याउलट राज्य हे सम्राट अशोकासारखे, शिवाजी महाराजासारखे करावे. हा ज्वलंत इतिहास साक्षी आहे, हे ध्यांनी धरावे. अन्यथा दिल्लीश्वरापासून राज्यश्वरापर्यंत मंडळीचे काही खरे नाही. म्हणून याठिकाणी सांगावेसे वाटते की, उठ गुलामा जागा हो । स्वातंत्र्याचा धागा हो । आणि गीतकार रविंद्र भट्ट आणि गायक सुधीर फडके यांनी गायलेल्या गाण्यात ते म्हणतात ' राष्ट्र वीर हो, सज्ज व्हा, उठा चला..... सशस्त्र व्हा । उठा चला..... उठा राष्ट्र वीर हो ।
सुरेश गायकवाड
0 टिप्पण्या