Top Post Ad

मनपा कामगारांना वैद्यकीय मदत मिळणार!

:मुंबई महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी हे गेल्या अनेक वर्षापासून मुंबई बाहेर उपनगरात राहावयास गेलेले आहेत.त्यांना अकस्मित आजाराची बाधा झाल्यास घराजवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागत होते. मात्र त्यानंतर त्याने आपल्या खात्याकडे वैद्यकीय आर्थिक मदतीस औषध उपचाराचा खर्च मागितल्यास महानगरपालिका देत नव्हती.त्यामुळे अनेक आर्थिक  संकटाना कामगार,कर्मचा-यांना तोंड द्यावे लागत होते.मात्र म्युनिसिपल मजदूर संघाच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून गट विमा योजना युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या मार्फत पालिका कर्मचारी, कामगार यांना वैद्यकीय मदत देण्यात येणार आहे.

यासंदर्भात नुकतेच मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे व सहआयुक्त सामान्य प्रशासनचे मिलिंद सावंत यांनी सर्व युनियनच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन ही गट विमा योजना लवकरच सुरू करत आहोत याची माहिती दिली.या बैठकीला विविध युनियनसह म्युनिसिपल मजूर संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव, सुधाकर गायकवाड ,रुपेश पुरळकर, नितीन कांबळे ,सागर कांबळे ,सुशांत रुके पश्चिम उपनगराचे अध्यक्ष गौतम सोनकांबळे पी विभाग अध्यक्ष रमेश पायके आदी पदाधिकारी उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुन्हा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी बरोबर तीन वर्षाचा करार करून महानगरपालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांना सहित दोन मुले वय वर्ष 25 पर्यंत व आई वडील किंवा सासू-सासरे यांना वर्षाला 5 पाच लाखाचा विमा देण्याचे निश्चित केले आहे. ही गट विमा योजना एक महिन्याच्या अवधीनंतर सुरू करण्यात येणार आहे. त्या अगोदर प्रत्येक कामगार कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवा अभिलेखात नवविवाहित असल्यास पती-पत्नीची लहान मुलांची नावे आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्या नावांची नोंद करून आपापल्या आस्थापनेतून करून घ्यावी असे आदेश दिलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com