इको फ्रेंडली लाईफ या संस्थेच्या वतीने १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त 700 कोटी वृक्षारोपण उपक्रम जनजागृतीच्या निमित्ताने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धा , चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी आपुलकी निर्माण व्हावी आणि देशभक्ती निसर्ग प्रेम वृद्धींगत व्हावे म्हणून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून किमान 700 कोटी वृक्षारोपण या उपकमाबाबत जनजागृती हेतुने विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पर्यावरणतज्ञ अशोक एन. जे. सर यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
1/ गट- अ 5 वी 7 वी,...2/ गट- ब 8 ते 10 वी....,3/ गट- क ज्युनिअर कॉलेज,.....4/ गट- ड सिनिअर कॉलेज असे गट करण्यात आले आहेत. . प्रत्येक गटातील 25 उत्कृष्ट स्पर्धकांना ट्रॉफी आणि सन्मानपत्र देण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गटातील पहिल्या तीन स्पर्धाकांना रोख रक्कम रुपये 10,000/, 7000/, 5000/ अशी बक्षिसे देऊन विशेष सन्मान करण्यात येईल. या स्पर्धेत मोफत प्रवेश देण्यात आला असून विशेष म्हणजे 1 ली ते 4 थी पर्यंत विद्यार्थ्यांना मी व माझा निसर्ग या विषयावर सहभागी होता येईल. त्याांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येणार आहे.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 1/ चित्रकला स्पर्धा विषय- माझे पर्यावरण माझी जबाबदारी, 2/ निबंधलेखन स्पर्धा... विषय- तरुण तगडा भारत जगात सर्वांत जास्त तरुण भारतात ... तरीही तरुणांचे नेतृत्व नाही देशात.... ह्या विषयावर इंग्रजी, मराठी, हिंदी निबंध किमान 500 शब्दांचा असावा आणि तो सुस्पष्ट असावा. तसेच आपले चित्र हे A /4 साईजच्या पेपरवर असावे. आणि चित्राला शिर्षक द्यावे. निबंधाच्या सुरुवातीला आणि चित्रकला पेपरच्या मागील बाजूस आपले नाव / पत्ता / शाळेचे नाव/ इयत्ता स्पष्ट शब्दात लिहावे. निबंध आणि चित्र व्यवस्थित स्कॅन करून ecofriendlylifeworld@gmail.com या इमेलवर 12 ऑगस्ट 2024 पूर्वी पाठवावे
अधिक माहितीकरीता.....खालील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
8888443392 / 9820657999 / 9619370267 / 9422776355
0 टिप्पण्या