Top Post Ad

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या नुतनीकृत कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण


 महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या अ‌द्य‌यावत नुतनीकृत कार्यालयाचे  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने कालिदास नाट्यगृह येथे सर्व मान्यवरांचा सत्कार, मार्गदर्शन कार्यक्रम व फार्मासिस्ट करिता प्रबोधनपर व्याख्यान देखील आयोजित करण्यात आली असल्याची माहिती  कौन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे, उपाध्यक्ष धनंजय जोशी तसेच निबंधक सायली मसाल यांनी आज दिली.  

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद हि राज्यातील ४.३०,००० हुन अधिक रजिस्टी फार्मासिस्ट (नोंदणीकृत औषध व्यवसायी) यांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था असून परिषदेच्या वतीने फार्मासिस्टला अत्याधुनिकते कडे नेण्यासाठी अद्‌ययावत नुतनीकृत कार्यालय निर्माण केले आहे    मुंबईतील आर स्क्वेअर लालबहादूर शास्त्री मार्ग मुलुंड पश्चिम येथील या अत्याधूनिक वास्तूचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, अजित पवार,. हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा आत्राम, प्रधान सचिव (MEDD)  दिनेश वाघमारे, फार्मसी कौन्सील ऑफ इंडिया, नवी दिल्ली अध्यक्ष डॉ मोटू कुमार पटेल व अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे याची देखील उपस्थिती लाभणार आहे.
उ‌द्घाटन सोहळ्यानंतर महाकवी कालिदास नाट्‌यगृह मुलुंड येथे मार्गदर्शक व सत्कार समारंभ सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून अंदाजे २००० फार्मासिस्ट, या क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत यावेळी सर्व माजी परिषद सदस्यांचा सत्कार, स्मरणिका प्रकाशन, डॉ. राजेन्द्र प्रताप गुप्ता यांचे फार्मासिस्ट ला "तंत्रज्ञान युगासाठी फार्मासिस्टची सज्जता" या विषयावर मार्गदर्शन सत्र होणार आहे.

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद ही महाराष्ट्र शासनाने गठीत केलेली स्वायत्त संस्था आहे. फार्मासिस्ट म्हणून अर्जदारांना रजिस्ट्रेशन देणे हे परिषदेचे मुलभुत कार्य आहे. परिषदेने फार्मासिस्टच्या हितासाठी त्याना औषध विषयक अ‌द्ययावत ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी स्वनिधीतून निर्माण केलेल्या औषध माहिती केंद्राच्या मदतीने निरंतर शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत उजळणी पाठ्‌यक्रम, कौन्सिलिंग कोर्स निर्माण केले आहेत. फार्मासिस्टला तांत्रिक ज्ञान व कौशल्ये यांनी स्वयंपूर्ण करण्याच्या हेतूने परिषदेचे जगन्नाथ शिंदे (कार्यकारी समिती सदस्य) यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिकतेची कास धरुन ५५०० स्क्वेअर फुट स्वमालकीचे कार्यालय खरेदी करून त्याचे नुतनीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये औषध माहिती केंद्रासाठी स्वतंत्र दालन. १०० फार्मासिस्टला जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणारे Interactive Screen असलेले आधुनिक सभागृह, कॉन्फरन्स हॉल तयार करण्यात आला आहे.   या  कार्यालयाचा चेहरामोहरा नुसता वरुन बदलला नसून, अंतर्बाह्य बदल करून पंजीकृत औषध व्यवसायींसाठी नवनवीन योजना राबवून त्यांच्या व्यावसायिक कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी परिषद प्रयत्नशील असणार आहे. म्हणून परिषदेने एकमताने "नाविन्याचा आहे ध्यास फार्मासिस्ट ची उन्नती हाच आमचा प्रयास" असे ठरविले आहे. 

आजपर्यंत परिषदेने २५ हजार पेक्षा जास्त फार्मासिस्टला "उजळणी पाठ्यक्रम", "कौन्सिलिंग कोर्सच्या माध्यमातून प्रशिक्षित केले आहे. काळाची पाऊले ओळखुन "ऑनलाइन" शैक्षणिक पाठ्यक्रमांची निर्मिती केली व परिषदेच्या संकेतस्थळावर जान अ‌द्यावत करण्यासाठी LMS (Learning Management System) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा ६ हजार पेक्षा अधिक फार्मासिस्टने लाभ घेतला. राज्यात महिला फार्मासिस्टकरता 'उंच माझी भरारी" हा सुप्त गुण जागृत करण्यासाठी कार्यक्रम देखील सुरू करण्यात आला आहे हॉस्पिटल फार्मसी, उत्पादन क्षेत्रांत काम करणा-या फार्मासिस्टसाठी प्रथमच "शेड्युल एम" या कार्यशाळाचे देखील आयोजित करण्यात आले होते. तरी या संपूर्ण कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कौन्सिलच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com