6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी या जपान देशातील शहरांवर दोन अणुबॉम्ब टाकले. बॉम्बस्फोटांमध्ये 150,000 ते 246,000 लोक मारले गेले, ज्यापैकी बहुतेक नागरिक होते आणि सशस्त्र संघर्षात अण्वस्त्रांचा एकमेव वापर राहिला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने केलेल्या या प्राणघातक हल्ल्याच्या 78 वा वर्धापन दिन स्मरणार्थ बॉम्बे सर्वोदय मंडळ आणि मुंबई शहरातील महाविद्यालयांच्या NSS युनिट्सने संयुक्तपणे शांतता रॅलीचे आयोजन केले होते. मुंबईतील सुमारे 600 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शांतता आणि अणुमुक्त जगाची हाक दिली. आम्ही जगभरातील कोट्यवधी लोकांसोबत अण्वस्त्रबंदीच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आवाहन करत आहोत. शस्त्रे आणि सर्व शस्त्रे"..., अणुबॉम्बच्या भीषणतेचे चित्रण. एसएनडीटी आणि मुंबई विद्यापीठाच्या 25 महाविद्यालयातील सुमारे 600 एनएसएस स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील शांतताप्रेमी नागरिकांच्या नेतृत्वात आज, 5 ऑगस्ट रोजी 1, मुंबईच्या आझाद मैदानावर विद्यार्थ्यांनी रॅली काढली
'नो मोअर हिरोशिमा', 'आम्हाला रोटी हवी बॉम्ब नको', नो बॉम्ब, येस पीस', 'नो वॉर, येस पीस' अशा प्रकारचे बॅनर आणि फलक हातात घेत ही शांतता रॅली आझाद मैदान ते हुतात्मा चौक अशी काढण्यात आली होती. हुतात्मा चौक येथे रॅलीची सांगता होत असताना विद्यार्थ्यांनी शांतता आणि अण्वस्त्रमुक्ती कार्य करण्याची शपथ घेतली मुंबई विद्यालयाचे एनएसएस समन्वयक डॉ. सुशील शिंदे आणि एसएनडीटी विश्वविद्यालय चे एनएसएस समन्वयक प्रो. नितिन प्रभुतेंदोलकर यांनी संपूर्ण गटाला शपथ दिली. यामध्ये बहुतेक नागरिकही सहभागी झाले होते आणि त्यांनी अणुमुक्त जग निर्माण करण्यासाठी जगभरातील लाखो लोकांच्या प्रार्थनेत हात जोडले. मुंबईतील विविध महाविद्यालयांमध्ये 'अण्वस्त्र निशस्त्रीकरण जनजागृती मोहीम' राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत हिरोशिमावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याची माहिती देणारे माहितीपट, पोस्टर प्रदर्शन आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना अण्वस्त्रांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली.
6 ऑगस्ट 1945 हा मानवाच्या इतिहासातील अतिशय दुर्दैवी दिवस. कारण याच दिवशी जपानमधील हिरोशिमा शहरावर अमेरिकेने 'लिटल बॉय' नावाचा अणुबॉम्ब टाकला होता. या हल्ल्यात सुमारे 1 लाख 40 हजार नागरिकांनी जीव गमावला होता, तर 9 ऑगस्ट 1945 रोजी 'बॉक्सकार' नावाच्या बी.29 विमानाने 'फॅट मॅन' नावाचा अणूबॉम्ब नागासाकी शहरावर टाकला होता. या हल्ल्यात नागासाकीमधल्या 80 हजारांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले. यामध्ये जे जगले त्यांना कायमचे अपंगत्व आले. हिरोशिमावर टाकलेला बॉम्ब हा ‘एनोला गे’ बी-29 बॉम्बरने ‘लिटल बॉय’ युरेनियम गन टाईप अॅटोमिक बॉम्ब होता. त्याचा स्फोट हिरोशिमा शहराच्या 2000 फूट उंचावर झाला. त्यात शहराचा पाच चौ. मैल एवढा भाग नष्ट पावला. या दोन्ही शहरांत मरण पावलेल्या लोकांतील निम्मे लोक हे बॉम्ब टाकलेल्या दिवशीच मरण पावले. त्यानंतरच्या महिन्यात अनेक जण भाजलेल्या जखमांमुळे, उत्सर्जित किरणाच्या आजारामुळे, अन्य जखमा, अपुरा आहार आणि आजार यामुळे मृत्यू पावले. हिरोशिमावर केलेल्या बॉम्बस्फोटामुळे झालेल्या विध्वंसानंतरही जपानने शरणागती पत्करली नाही. म्हणून 9 ऑगस्ट रोजी अमेरिकेने कोकुरा शहराच्या प्राथमिक लक्ष्यासाठी आणखी एक बी-29, बॉक्सकार पाठवले. कोकुरावर असलेल्या दाट ढगांनी पायलट मेजर चार्ल्स स्वीनी यांना बॉम्ब टाकण्यापासून रोखले. म्हणून दुसरा निशाणा डोंगरांमध्ये वसलेल्या नागासाकीवर बसला. सकाळी 11.02 वाजता टाकलेला ‘फॅट मॅन’ हा प्लूटोनियम बॉम्ब हिरोशिमामध्ये वापरलेल्या बॉम्बपेक्षा अधिक शक्तिशाली होता. त्यातून 22 किलोटनचा स्फोट झाला. नागासाकी बॉम्बस्फोटानंतर सहा दिवसांनी 15 ऑगस्ट रोजी सम्राट हिरोहितोने जपानच्या आत्मसमर्पणाची घोषणा एका रेडिओ प्रसारणात केली. 2 सप्टेंबर रोजी टोक्यो खाडीवर अँकर केलेल्या अमेरिकन युद्धनौका मिसौरीवर शरण येण्याचा औपचारिक करार झाला. कारण दोन शहरातील बहुतांश पायाभूत सुविधा पुसून टाकल्या गेल्या होत्या. दोन बॉम्बस्फोटांमुळे झालेल्या मृत्यूंची वास्तविक संख्या कधीच कळू शकली नाही.
हिरोशिमा, नागासाकी या शहरांवरील हल्ल्यानंतरही जगात दोन हजारांहून अधिक आण्विक शस्त्रांच्या चाचण्या झाल्या. 1945 ते 1980 या काळात जगातील 500 हून अधिक ठिकाणी वातावरणातील आण्विक शस्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया या देशांचा समावेश आहे. या देशांनी आण्विक शस्त्रांच्या चाचण्या घेतल्या आणि त्याची कबुलीही दिली. या गोष्टींची तीव्रता येणाऱ्या काळात अधिक जाणवणार आहे. याकरिता प्रत्येकाने शांततेचा प्रचार करणे आवश्यक आहे. याकरिताच या रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.
बेचिराख होऊनही जपान थांबला नाही. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेतली. आपल्यासोबतच स्वतंत्र झालेले हे तुलनेने चिमुकले राष्ट्र ! आज कुठल्या कुठे पोहचले. इकडे काय सुरू आहे 'हिंदूस्ताना'त...?
रामाचा पाळणा बाबरीखाली शोधण्यात ते मश्गुल आहेत. यान अवकाशात सोडण्यापूर्वी सरकारी सत्यनारायण घातले जात आहेत. पाऊस पाडण्यासाठी यज्ञ केले जात आहेत. गाईच्या पोटात 33 कोटी देव असतात यावर शिक्कामोर्तब केले जात आहे. गोमुत्राला अमृतासमान लेखले जात आहे. अंधश्रद्धेवर घाव घालणारांचे मुडदे पडत आहेत. गुन्ह्यातील आरोपी मोकाट फिरत आहेत. लव जिहादवर संताप; तर 'घर वापसी'वर आनंद व्यक्त केला जात आहे. अभ्यासक्रमात भविष्यशास्त्र लावण्याचे मनसुबे रचले जात आहेत. मिसाईल मॅनच्या हातात वीणा दिली जात आहे. न्यायालयापुढे संविधानकाराऐवजी मनूचे पुतळे उभारले जात आहेत. पश्चिम बंगालमध्ये मत्स्यपुराण ऐकविले जात आहे. बलात्काराचा आरोपी आधुनिक कृष्ण आसारामपुढे संघप्रमुख मोहन नतमस्तक होत आहेत. विजय मल्यासारख्या दरोडेखोरावर मेहरबानी दाखविली जात आहे. एक न् दोन ! आणि हे सर्व कशासाठी ? तर हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी !
हा एकूणच प्रकार कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्यासारखा वाटतो.
अच्छे दिन येतील न येतील. पण 'मन की बात' मात्र आता संविधानावर प्रेम करणा-या समस्त भारतीयांच्या हळू हळू लक्षात येताहे. ही गती धिमी आहे. वाढवावी लागेल !
भारतियांनो , जगासमोर टिकायचे असेल तर पुढे चला; मागे नको !
चला विज्ञाननिष्ठ भारताकडे...
प्रबुद्ध भारताकडे...
समृद्ध भारताकडे...
समताधिष्ठित भारताकडे !
अणूबाॅम्ब हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप जपानवासियांना भावपूर्ण श्रद्धांजली !
भवतु सब्ब मंगलं !!
0 टिप्पण्या