Top Post Ad

संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन

  महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी आणि वाढवण्याच्या प्रबळ हेतुने २ ऑगस्ट रोजी नवी मुंबईत संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले  असल्याची माहिती प्रविण गायकवाड यांनी आज प्रसिद्धी माध्यमांना दिली. महाराष्ट्राच्या इतिहास, सांस्कृतिक, सामाजिक व अर्थकारणाच्या क्षेत्रात गेली २७ वर्षे सातत्याने काम करून मराठा-बहुजन समाजात वैचारिक बदल घडवून आणणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटनेचे हे एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन. २२ ऑगस्ट २०२४ रोजी वाशी (नवी मुंबई) येथील विष्णुदास भावे नाट्यगृह याठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत पार पडणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन आ. रोहित पवार, खा. अमोल कोल्हे, आ. शशिकांत शिंदे तसेच सिनेअभिनेते सयाजी शिंदे, निखिल चव्हाण व गौरव मोरे आदि मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे

ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, विजयसिंह मोहिते पाटील आदि मान्यवर या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असून संभाजी ब्रिगेडच्या बदलाचा मागोवा व भविष्याचा वेध घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष व अधिनेशनाचे निमंत्रक प्रविणदादा गायकवाड यांनी केले आहे.

. पहिल्या सत्रामध्ये पत्रकार अभिजीत करंडे हे "गोष्ट पैशापाण्याची" या विक्रमी पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांची मुलाखत घेणार आहेत. तर दुसऱ्या सत्रामध्ये ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार हे "महाराष्ट्र धर्म काय शिकवतो?" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तिसऱ्या सत्रामध्ये निर्भिड पत्रकार निरंजन टकले हे "गांधीजींच्या स्वप्नातील भारत" या विषयावर संबोधित करणार असून लेखक चंद्रकांत झटाले या सत्रासाठी उपस्थित राहणार आहेत. चौथ्या सत्रामध्ये ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव हे "भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या विचारधारेची लोकशाही" या विषयावर आपले मनोगत व्यक्त करणार असून खा. भास्कर भगरे व सामाजिक कार्यकर्ते प्रदिप सोळुंके हे या सत्रामध्ये उपस्थित असणार आहेत. अधिवेशनाच्या समारोपीय सत्रामध्ये ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विशेष उपस्थितीत कोल्हापूरचे नवनिर्वाचित लोकसभा खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा शाही सन्मान सोहळा पार पडणार आहे. तसेच वरील मान्यवरांच्या हस्ते अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे चेअरमन राजेंद्र पवार, सह्याद्री फॉर्म्स नाशिकचे मॅनेजिंग डायरेक्टर विलास शिंदे व सुप्रसिद्ध उद्योजक सतिश मगर यांना विश्वभूषण (कृषी) पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अधिवेशनाबद्दल अधिक माहिती, नावनोंदणी व संपर्कासाठी sambhajibrigade.org या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सागर भोसले (विभागीय अध्यक्ष मुंबई). अजबसिंह सावंत (प्रदेश संघटक). सध्रिययावत देसाई देश संघटक) सुधीर भोसले (प्रदेश कार्याध्यक्ष).  इत्यादी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com