Top Post Ad

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत १५% प्रतिनिधित्वाकरिता मुस्लिम समाज आक्रमक


 नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सेक्युलरवादी विचारसरणीतून व संविधान वाचवण्याकरिता समस्त मुस्लिम समाजाने निवडणूक प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवित महाविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान केले होते, त्याचा परिणाम म्हणूनच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला तसे यशही मिळाले. मात्र या यशानंतर महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाच्या मागण्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. लोकसभा निवडणुकीनंतर उपस्थित झालेले मुस्लिम समाजाशी संबंधित सर्व प्रश्नांना जाणिवपूर्वक बगल देण्याचे काम आघाडी सरकारकडून होत असून त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे वक्फ बोर्डाच्या प्रकरणात महाआघाडीच्या घटक पक्षाने अर्थात शिवसेनेचे खासदार सदनामधून बाहेर निघून गेले. याचा अर्थ येवढाच की मुस्लिम समाजाच्या प्रश्नांबाबत मौन बाळगायचे. त्यामुळे महाविकास आघाडीची भूमिका मुस्लिम समाजाला पुरक नसल्याचे चित्र निर्माण झाले असून याबाबत मुस्लिम समाजाने येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जर महाविकास आघाडीने १५ टक्के प्रतिनिधीत्व दिले नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असे स्पष्ट मत सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. याबाबत प्रसिद्धी माध्यमांना माहिती देण्याकरिता आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटचे  अॅड मोहम्मद अफरोज मुल्ला, मुफ़्ती सय्यद वसीम अहमद क़ासमी, मौलाना मोहसीन खान साहेब, सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट, मुस्लिम वोटर्स कौंसिल ऑफ इंडिया कॉन्व्हेनर खान अब्दुल बारी खान, प्रो आकिफ दफेदार, प्रो. सज्जाद मापारी, ऍड सुलतान खान, सलीम सिद्दीकी, जावेद शेख, नॅशनल फोरम ऑफ मुस्लिम इंटेलेकछुअल, कॉन्व्हेनर हारून एफ्रोज, मौलाना लुकमान नदवी, प्रो इश्तियाक खान उपस्थित होते

सद्यस्थितीमध्ये मुस्लिम समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व शून्यगणिक आहे, विधान परिषदेवर एकही आमदार नाही, वर्षानुवर्षापासून लोकसभेचा समाजाचा उमेदवार ही नाही. अनेक मतदारसंघांमध्ये मुस्लिम समाजाचे मतदान हे निर्णायक राहते, एकंदरीत तब्बल 65 विधानसभाक्षेत्र मुस्लिम समाज मतदानबहुल आहेत. लोकतांत्रिक निवडणुक प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेऊनही एका समाजच्या राजकीय प्रतिनिधित्वाची अशी परिस्थिती चिंताजनक बाब असून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकी मध्ये मुस्लिम समाजाच्या जनसंख्या टक्केवारीनुसार म्हणजेच 15% उमेदवारी महाविकास आघाडी तर्फे मिळावी जेणेकरून मुस्लिम समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व निर्माण होईल. याबाबत सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटने महाविकास आघाडीच्या नेत्यांना एक औपचारिक पत्र पाठवले आहे,  शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस यांना पाठवलेल्या पत्रात सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटने नमूद केले आहे की, मुस्लिम समाज महाराष्ट्राच्या सुमारे १५% लोकसंख्येचा भाग आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत, विधान परिषदेत मुस्लिम सदस्य नाहीत, तसेच लोकसभा मतदारसंघांमध्ये देखील प्रतिनिधित्व नाही. मुस्लिम मतदार महाराष्ट्रातील सुमारे ६५ विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये निर्णायक ठरतात. यानुसार, मुस्लिम समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार म्हणजेच १५% विधानसभेच्या जागा देण्यात याव्यात अशी भूमिका व्यक्त केली आहे. 

या मुद्द्यावर अद्याप कोणतेही सकरात्मक उत्तर मिळालेलं नाही, मुस्लिम समाजाला जाणिवपुर्वक डावलण्याचे काम जर सर्वच राजकीय पक्ष करीत असतील तर याबाबत सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट संपुर्ण महाराष्ट्रभर जनजागृती करण्याचे काम करून समविचारी लोकांना एकत्र करण्याकरिता राज्यभर 'यात्रा' सुरू करणार आहे,  कोल्हापूरपासून या यात्रेचा प्रारंभ 30 ऑगस्टला होईल. या यात्रेद्वारे, प्रतिनिधित्वाच्या मुद्द्याची व्यापक चर्चा केली जाईल आणि राजकीय पक्षांना प्रतिनिधित्वाबाबत योग्य असलेले स्थान देण्यासाठी मागणी केली जाईल. तसेच येणाऱ्या काळात मुस्लिम समाजाची भूमिका स्पष्ट करण्याकरिता समाजाला आवाहन केले जाईल. आणि जे आज या समाजाला डावलत आहेत त्यांना येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असेही फ्रंटच्या वतीने आवाहन करण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com