प्रस्थापितांनी आजपर्यंत स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या बाजूने लढणाऱ्या फुले शाहू आंबेडकरवादी चळवळींना नेहमीच वापरण्याचा किंवा शेपूट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे.महात्मा जोतिराव फुले यांनी उभी केलेली सत्यशोधक चळवळ पुढे सरंजामी मिरासदार शेतकऱ्यांच्या पुढारपणामुळे ब्राह्मणेत्तर चळवळीत रूपांतरित झाली. सरंजामी पार्श्वभूमी असलेल्या नेतृत्वाने पुढेही ब्राह्मणी तर चळवळ काँग्रेसमध्ये विलीन केली. जेधे-जवळकरांच्या ब्राह्मणेत्तर चळवळीचे काँग्रेसमध्ये विलिन होणे ही सामाजिक समतेच्या लढ्यातील पहिली समरसतावादी कृती ठरली. ज्यामुळे सत्यशोधक चळवळ पार लयाला गेली. हा इतिहास खुप काही सांगून जातो. महात्मा जोतिराव फुले यांना आपले गुरु मानले तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या समकालीन असलेल्या ब्राह्मणेत्तर चळवळीत सामील न होता स्वतंत्र चळवळ उभी केली. त्याचे मुख्य कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या चळवळीला लाचार बनू द्यायचे नव्हते. त्यांना चळवळ स्वाभिमानाच्या पायावर उभी करायची होती. म्हणूनच बाबासाहेबांनी प्रसंगी जेधे जवळकरांना खडे बोलही सुनावलेली आहेत.
आज बाबासाहेबांचा हा स्वाभिमानी वारसा जपत बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा राजकीय एल्गार उभा केलेला आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रस्थापितांच्या राजकारणाला सुरुंग लावलेला आहे. परंतु आज संविधानाच्या रक्षणासाठी एक पाऊल मागे येत त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना यासारख्या प्रस्थापित जात वर्ग चारित्र्य असलेल्या पक्षांची महाविकास आघाडीत युतीबद्दल चर्चा करावी लागली होती. परंतु "सुंभ जळाला तरी पीळ निघत नाही" अशी प्रस्थापितांची अवस्था आहे. वंचित बहुजन आघाडीला समतेची वागणूक देण्याऐवजी मविआचे नेते वंचितांची ताकद वापरण्याच्या हेतूने प्रेरित होते. त्यामुळेच ४० लाखापेक्षा जास्त मतदान घेणाऱ्या आणि प्रचंड मोठा मास बेस असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला चर्चेमध्ये झुलवत ठेवून केवळ दोन जागांच्या वर बोळवण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी कडून सुरू होता. परंतु बाळासाहेब आंबेडकरांसारखे स्वाभिमानी आणि बाणेदार नेतृत्व या महाविकास आघाडीच्या प्रस्थापितांना न जुमानता आपल्या चळवळीला लाचार होण्यापासून रोखण्यास खंबीर आहेत. म्हणूनच त्यांनी आज वंचित बहुजन आघाडीच्या आणि फुले शाहू आंबेडकरवादी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे की आपली चळवळ लाचार बनू देऊ नका. वंचित बहुजन आघाडीने प्रस्थापित जात वर्ग चारित्र्य असलेल्या महा विकासाकडे बरोबर जाणे ही एक प्रकारची राजकीय समरसतावादी कृती ठरू नये म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक पाऊल खूप जपून विचारपूर्वक टाकत आहेत. आपण ठामपणे बाळासाहेबांच्या पाठीमागे आपली ताकद उभी केली पाहिजे!*
वर्क इंडियाच्या अहवालानुसार, 57.63 टक्के खासगी नोकऱ्यांना 20,000 रुपये किंवा त्याहून कमी पगार आहे. अशा परिस्थितीत या लोकांना किमान वेतनही दिले जात नाही. सुमारे 29.34 टक्के खासगी नोकऱ्या या मध्यम उत्पन्न गटातील आहेत. यातील वेतन 20,000 ते 40,000 रुपये प्रति महिना आहे. या वर्गात मोडणाऱ्यांच्या जीवनात थोडीफार सुधारणा होते. पण, त्यांना आरामदायी राहणीमान गाठता येत नाही. केवळ 10.71 टक्के लोक 40,000 ते 60,000 रुपये प्रति महिना पगार मिळवू शकतात.केवळ 2.31 टक्के खासगी नोकऱ्या लोकांना 60 हजार रुपयांपेक्षा जास्त कमावण्याची संधी देऊ शकतात.
0 टिप्पण्या