घराणेशाहीने थैमान घातलेल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा विकास पुरुष म्हणून, सर्वधर्मसमभाव पाळणारा नेता म्हणून. बहूसंख्याक समाजाचे नेतृत्व करणारा म्हणून, महाराष्ट्र विकासाचे व्हिजन असलेला बहुआयामी नेता म्हणून किंवा जात आणि धर्माच्या पलिकडे जाऊन नेतृत्व करणारा म्हणून एकमेव असा चेहराच नाही. ही वस्तुस्थिती आहे...!!
महायुती मधील भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. हातातोंडाशी आलेले मुख्यमंत्री पद शिवसेनेने हिसकावून घेतले म्हणून तर शिवसेनेची,राष्टवादी कॉंग्रेस पक्षाची फोडतोड करावी लागली. काहीही करुन मुख्यमंत्री होणे हे देवेंद्र फडणवीस यांचे ध्येय आहे. त्यासाठी ते १५० जागांचा आग्रह करीत आहेत.मात्र देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर करता येतं नाही ही भाजपची अडचण आहे....!! महायुती मधील शिवसेनेचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री पदावर कायम राहिलो पाहिजे म्हणून प्रचंड मेहनत घेत आहेत तेही मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत. लाडकी बहीण, लाडका भाऊ. काहीही करुन पुन्हा मुख्यमंत्री होऊ...!! अजित दादा पवार यांना काहीही करुन मुख्यमंत्री व्हायचे आहेच त्यासाठी काका सोबतं पिंगा घेण्याची एवढी मोठी कसरत केली आहे...!!
शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फरपट झाली तरीही हरकत नाही मात्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचेच आहे. मुख्यमंत्री पदासाठीच तर ते भाजप सोडून मविआ मध्ये आले आहेत.महाराष्ट्रात मला सहानुभूती आहे या गोड भ्रमात उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांना ब्लॅकमेल करतात आणि दबाव वाढवितात...!! कॉंग्रेस पक्षाचे नाना पटोले हेही मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत, मनातलं राज्यात पोहचलं पाहिजे म्हणून ते समर्थकांकडून बॅनरबाजी करीत मनातलं जणात सांगतं असतात...!! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनविणे हा शरद पवार यांचा अंतिम डाव आहे. ते बोलून दाखवतं नाहीत. वेळ आली की, संधी सोडतं नाहीत....!! कॉंग्रेस पक्षाचे पृथ्वीराज चव्हाण हेही मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत ते आपलं दिल्लीतील वजन वापरून पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रचंड आशावादी आहेत...!! महायुतीचे तीन आणि मविआ चे चार असे एकूण सात जणं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत....!!
राजकारण सरळ आणि सोपं नाही. वरवर दिसतेय तेवढे सहज आणि टी. वी.दाखवितो आणि वृत्तपत्र मांडतेय तेवढेचं त्याचे रुप नसते त्याच्या पलीकडे राजकारण रंगत असते...!! मीच मुख्यमंत्री झालो पाहिजे या इर्षेपोटी महायुती मध्ये आपसात पाडापाडीचे सत्र सुरू राहिलं तसेच ते मविआ मध्ये सुद्धा असेल. आपसात लाथाडीचा मोठा सामना रंगणार आहे. खोके संस्कृती मुळे प्रत्येकाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत...!! कुणाकडे आमदारांनी संख्या जास्त आहे हा निकष लावला जाईल म्हणून आपल्या आघाडीतीलचं सहकारी पक्षाला रोखण्याची विकृत चाल सुद्धा खेळली जाईल...!! आघाडी मध्ये कमी जागा मिळाल्या म्हणून विश्वासातील माणसांना बंडखोरी करायला लाऊन अपक्षांचे मोठे पिकं येणार आहे. जसे सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील निवडून आल्यानंतर कॉंग्रेस पक्षात विलीन झाले तसे अनेक अपक्ष आमदार निवडून आल्यानंतर आपल्या मुळ पक्षात विलीन होतील...!!
महायुती, मविआ,ओबीसी आणि वंचित बहुजन आघाडी, स्वराज्य पक्ष आणि जरांगे आघाडी. छोटे पक्ष, आणि बंडखोर अपक्ष अशा प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात यावेळी चौरंगी पंचरंगी सामना रंगणार आहे...!! इलेक्ट्रॉनिक्स मिडिया आणि प्रिंट मिडिया ने कितीही दुरंगी लढतीचे चित्र रंगविले तरीही आजची राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात चौरंगी पंचरंगी लढतीचीच आहे...!! घराणेशाही मुख्यमंत्री पदासाठी एक दुसऱ्या च्या ऊरावर नाचणार आहे. या साठमारीत फुले शाहू आंबेडकरी मतदार, मुस्लिम आणि ओबीसी मतदारांनी धोरणी निर्णय घेतला तर महाराष्ट्रात सत्तेचा ऊलटफेर होईल असे संकेत मिळतात....!! ज्या मातब्बर जातीचा आजपर्यंत महाराष्ट्रातील राजकारणात वरचष्मा होता त्या मतांची महायुती, मविआ,स्वराज्य पक्ष आणि जरांगे पाटील हे लांंडगेतोड करणार हे निश्चित आहे...!!
@.. भास्कर भोजने.
0 टिप्पण्या