सर्वोच्च न्यायालयाने आदेश देवूनही बेदखल राहिलेल्या अंगणवाडी सेविका, एलआयसी कॉलनीतील रहिवाशांचा होणारा छळ, सेस इमारतींचा पुनर्विकास, हिंदू खाटिक समाजाच्या विकासासाठी प्रलंबित मागण्या, विमानतळ परिसरातील झोपड्यांचं पुनर्वसन अशा विविध मागण्यांसाठी संघटनांचे लोक आझाद मैदानात आंदोलन करताहेत. राज्य सरकारने या आंदोलकांना पुर्णपणे दुर्लक्षित केलंय. मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्ष, खासदार वर्षाताई गायकवाड यांनी या आंदोलकांची भेट घेवून त्यांच्यासाठी सर्व पातळ्यांवर आवाज उठवू असा दिलासा दिला आहे. आपल्या मागण्यांसाठी दाद मागायला येणाऱ्यांना आझाद मैदानातील कोपऱ्यात बसवलं जातं. केवळ मोठमोठी आश्वासन देणारं शिंदे-फडणवीस-पवार सरकारने आजवर या कुठल्या आंदोलकाची साधी दखलही घेतलेली नाही. मात्र वर्षाताई गायकवाड यांनी काल आझाद मैदानातील या सगळ्या आंदोलकांची आत्मियतेने भेट घेवून त्यांना दिलासा दिला.
मुंबई आणि महाराष्ट्रात हिंदू खाटिक समाज आहे. या समाजातील नेते डॉ. संतुजी लाड यांचं स्मारक आणि इतर प्रश्नांबाबत विरोधी पक्षनेत्यांसोबत बोलून आवाज उठवला जाईल, असं आश्वासन वर्षाताई गायकवाड यांनी दिलं. मुंबईतील एलआयसीच्या अखत्यारितील सेस इमारतींमध्ये रहाणाऱ्या रहिवाशांचा छळ आणि या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत केंद्र सरकारकडे दाद मागू असंही वर्षाताई गायकवाड यांनी सांगितलं. विमानळाच्या जमिनीवरील झोपड्यांच्या विकासाबाबत करार होवूनही अंमलबमागणी झाली नसल्याने एकता समाज कल्याण सेवा संस्थेचे रहिवासी आठ दिवस उपोषण करतायत. या प्रश्नावर आवाज उठवू असं वर्षाताईंनी सांगितलं. त्यामुळे हे उपोषण थांबवलं गेलं.
लोकांच्या घराघरात जावून अंगणवाडी सेविका सहा सेवा पुरवतात. कोविड काळात या सेविकांनी योद्ध्यासारखं काम केलं… मात्र सतत संघर्ष करावा लागतोय. सुप्रीम कोर्टाने निकाल देवूनही हे सरकार अंमलबजावणी करत नाही. मुख्यमंत्री खूप घोषणा करतायत. राजा उदार झालाय, पण हाती काय? भोपळा! आता अंगणवाडी शिक्षिका, सेविकांनी जोरदार एल्गार करावा, आम्ही सोबत आहोत, असा विश्वास मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्ष, खासदार वर्षाताई गायकवाड यांनी दिला आहे. अंगणवाडी शिक्षक, सेविकांना शासकीय दर्जा मिळावा या मागणीला आमचा पाठिंबा आहे. याबाबत मी लोकसभेतही आवाज उठवीन, असं सांगत तुमची ताकद काय आहे, ती यांना आता दाखवायची गरज आहे. तुम्ही तक्ता पलटवू शकता. तरच प्रश्न सुटू शकतो एल्गार करावा लागेल. आम्ही सोबत आहोत.
0 टिप्पण्या