Top Post Ad

... तर सार्वजनिक बांधकाम खात्यापासून सर्वांची नावे व्याख्याने घेऊन जाहीर करा

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्ट राजकारणी लोकांच्या निर्लज्ज स्वार्थामुळे पडला, ह्यामागे भाजपाच्या अब्रूची लक्तरे आता वेशीवर टांगली गेली आहेत, हे एव्हाना महाराष्ट्राला ठाऊक झाले आहे !  सदानकदा हिंदू संकटात, पुरोगामी हिंदूच हिंदुंचे वैरी असे कंठरवाने बोंबलणारे शरद पोंक्षे ह्यांच्या जीभेवरील शारदा, आता अंदमानला गेली की काय ? ...आणि केकाटत आक्रस्ताळेपणा करत हिरव्या रंगाचा अर्थ समजावून सांगणारी   चितळे आता कुठे अरण्यरुदन करत बसली आहे ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संकल्पनेपासून ते त्याचे बांधकाम, अनावरण करणारे सर्व हिंदूच आहेत ना ?  आता बोला ना पोंक्षे की, हिंदूच हिंदूंचे दुश्मन आहेत आणि खरे हिंदू असाल तर सार्वजनिक बांधकाम खात्यापासून सर्वांची नावे व्याख्याने घेऊन जाहीर करा परंतु स्वतःच्या दुर्धर आजारात उद्धव ठाकरे ह्यांनी केलेली मदत विसरुन, कृतघ्न माणसासारखे पोंक्षे ह्यांच्याकडून काय अपेक्षा करणार ? शिवरायांचा उपमर्द करणाऱ्या, त्याची विटंबना करणाऱ्या लोकांविरुद्ध बोलण्याची ? गांधी ह्यांच्या टीकेचे धनी आणि सावरकर ह्यांचे मुकुटमणी !!  ह्या असल्या विकृत चाळ्यांनी आणि पक्षपाती बुद्धीने, महाराष्ट्राच्या विवेकाला पक्षपाताचा झटका आणलेला आहे.  


 संघीय वृत्तीची ही मानसिकता आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे.   दहीहंडीत जखमी झालेले गोविंदा दिसतील त्यात ब्राह्मण समाजातील असा एक वरच्या थरावरून पडून जखमी झालेला एकतरी कुलकर्णी, साठे, पेठे, आपटे, पटवर्धन दाखवा. एकही दिसणार नाही...पण, हिंदुत्वाचे धडे तुम्हाला द्यायला आणि त्यासाठी उत्सव जपून, डोकी फोडायला तुम्हाला हे प्रवृत्त करतील. आमच्यासारख्या लोकांनी विरोध केला की, आम्ही संस्कृती-भक्षक आहोत, हे बोंबलून सांगतील.  जखमी मुलांमध्ये बहुजन समाजातील मुले असतील, कारण सध्या बहुजन समाज हाच मूर्ख बनत चालला आहे.  नव्याने शिकणारा ब्राह्मण समाज गोंधळलेला म्हणजेच, confused आहे. थोडाफार दलित समाज तरी sorted म्हणजेच सुस्पष्ट वाटतो. शेतकऱ्याच्या शेतातील तृणासही हात लावू नका, असे सांगणारे आमचे नीतिमान महाराज, त्यांचा पुतळा उभारणारे अनितीमान, भ्रष्ट राजकीय नेते हे आज हिरो, हिरॉईन ह्यांच्याबरोबर दात काढत, खिदळत दहीहंडी साजरी करत होते. कालच आपल्या भ्रष्ट कारभारामुळे महाराजांचा पुतळा पडला, ह्याची लाज, लज्जा, शरम कोणत्याही संबंधित राजकीय व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. 

इथे आमच्या महाराष्ट्राच्या खऱ्या हिरोचा, आमच्या महाराजांचा पुतळा पडलाय आणि तुम्ही गौतमी पाटील काय नाचवताय ? डिजे काय बडवताय ? शरम विकून खाल्ली की, असे होते !  संघाच्या कोणत्याच व्यक्तींनी, मोहन भागवत वगैरेंनी अजून निषेध नोंदवलेला नाही. संघाचे बाकी भारीच काम सुरु आहे. लोकमान्य टिळकांच्या हाती काँग्रेस असेपर्यंत ह्यांना आनंद होता...कारण, पेशवाई बुडाली आणि इंग्रज आले तर इंग्रजांविरुद्ध सत्ता, ही ब्राह्मणांच्या हातात हवी ( गोखल्यांची सायकल गांधींनी का घेतली ? ) इथून ह्यांचा द्वेष सुरु होतो. 1923 साली हे संघाचे लोक मुसोलिनीला इटलीला जाऊन भेटले आणि मुसोलिनीच्या ब्लॅक शेड आर्मिच्या धर्तीवर ह्यांनी काळी टोपी धारण करुन राष्ट्रीय स्वयंसेवक बनवला. संघ ही मुळात ब्राह्मणांची विकृती आहे आणि त्यातून निर्माण झालेला चावटपणा म्हणजे भारतीय जनता पार्टी (माझ्या ब्राह्मण नातेवाईकांनी आणि मित्रांनी मला माफ करावे, पण हेच सत्य आहे) काळा रंग आपल्याला वर्ज्य आहे पण, टोपीसाठी तोच निवडला गेला...कारण, मुसोलीनीच्या ब्लॅक-शेड आर्मीची टोपी काळी... आणि, तिथून आल्यावर 1925 साली ह्यांनी संघाची स्थापना केली. ह्यांना इटालियन मुसोलिनी चालला; पण, रीतसर विवाह करुन भारतात आलेली इटालियन बाई सोनिया गांधी चालत नाहीत. तेव्हाचे डॉक्टर हेडगेवार, हे माणसांचे डॉक्टर होते आणि आताचे मोहन भागवत हे गुरांचे डॉक्टर आहेत...ही आहे संघाची शैक्षणिक परंपरा !! 

अच्युतराव वैद्य नेहरुंना आणि काँग्रेसला दूषणे देत... कुरुलकर, नेहरु आणि काँग्रेसचा द्वेष करत, सावरकरांवर व्याख्याने द्यायचे. गंमत बघा. वैद्य हे नेहरुंनी स्थापन केलेल्या BARC मध्ये कामाला आणि हा कुरुलकर, नेहरुंनीच स्थापन केलेल्या DRDO मध्ये कामाला होता.  अडचण आज अशी आहे की, पूर्वी नेते शिकलेले होते आणि जनता अडाणी होती, आज जनता शिकलेली आहे आणि नेते अडाणी आहेत. आज ह्या भारतीय राजकारणात राहुल गांधी, हा एकच आश्वासक चेहरा आहे... जो आजी आणि वडील मारला गेल्यानंतर लढतो आहे. साडेतीन हजार किलोमीटर भारत चालून तुम्हाला घाम फोडतो आहे...असो.  शिवरायांचा पुतळा पाडण्याचे पातक जे तुम्ही केले आहे ना, महाराष्ट्रातील जनता त्याचा कडेलोट केल्यावाचून राहणार नाही. 

-- राज गोखले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com