महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील भव्य पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळल्याच्या घटनेचे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते पण भाजपा युती सरकारला भ्रष्टाचाराची इतकी कीड लागली आहे की त्यांना महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला. महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राच्या अस्मितेला भाजपा सरकारने कलंक लावला आहे. महाराजांचा पुतळा कोसळून जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करत असते. यावेळी त्यांनी कहरच केला आहे. कमीशनखोरीसाठी किमान आपले आराध्य दैवत महाराजांना तरी सोडायला हवे होते पण भाजपाला त्याचे काही देणेघेणे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुंबईत BKC येथे येत आहेत. यावेळी तीथेच महायुती सरकार भाजपा व पंतप्रधान मोदींचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात येईल असे प्रतिपादन गायकवाड यांनी केले आहे.
आधी तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आणि कमिशनच्या लालसेपोटी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवता. यावर जनतेच्या वेदना, संतापाचा उद्रेक झाला तर तो व्यक्त करण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही हुकूमशाहीचा अवलंब करता? वाह...आम्ही अट ठेवली होती की, महाराष्ट्रात येण्यापूर्वी मोदीजींनी इथल्या १३ कोटी जनतेची माफी मागावी. माफी तर दूरच राहिली, आज पोलिसांच्या माध्यमातून आम्हाला विरोध व्यक्त करण्यापासून रोखले जात आहे.काल राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांशी गैरवर्तन.. आणि आज काँग्रेसला नोटीस! मोदीजी, तुमची भीती स्पष्ट दिसतेय..तुम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या रोषापासून दूर पळत आहात. आणि सामना तरी तुम्ही कसा कराल? डबल इंजिनच्या बळावर भ्रष्टाचाराने महाराजांना दुखावणारे तुम्हीच तर आहात. पण शिवद्रोहींना आणि महाराष्ट्रद्वेषीना महाराष्ट्र धडा शिकवेल हे जाणून घ्या. शिवरायांच्या भक्तीसाठी,महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी,आम्ही लढत राहू, महाराष्ट्रद्रोहींना नडत राहू..!आम्ही शिवरायांचे मावळे. शिवरायांनी आम्हाला प्रत्येक आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याची शिकवण दिली. आपल्या आराध्य दैवताचे अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही..! BKC ला जाऊन मी आणि काँग्रेसचे आमचे मावळे पंतप्रधानांना जाब विचारणारंच..... -.मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड*
0 टिप्पण्या