मैत्री पाहायला गेलं तर अगदी दोन अक्षरी शब्द पण या दोन अक्षरी शब्दात जगातील सर्वात पवित्र अशी भावना लपली आहे. जगातील सर्वात सुंदर नातं कोणतं असेल तर ते मैत्रीचं नातं, कारण या नात्यात कोणताही स्वार्थ नसतो. मैत्री कधीही ठरवून होत नाही. मैत्री कशी, कधी, कोणाशी होईल हे कोणीच सांगू शकत नाही. मैत्रीला काळाची, वेळेची, वयाची बंधने नसतात. मैत्रीत जात, धर्म, वर्ण, लिंग असा कोणताही भेदभाव नसतो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणाशीही मैत्री होऊ शकते. समान छंद, समान आवडी, समान विचारधारा आणि परस्परांचे स्वभाव जुळले की मैत्री जमते. रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नाते महत्वाचे आहे. जगात मित्र नाही असा कोणताच व्यक्ती नाही. भारतात तर पौराणिक काळापासून मैत्रीला महत्व आहे. श्रीकृष्ण सुदामा यांची तर मैत्री अजरामर आहे. काळ बदलला तरी मैत्रितील पवित्र भावना आजही तीच आहे. मैत्री ही प्रामाणिक आणि तरळ भावना आहे. मित्रा समोरच आपण आपलं मन मोकळं करू शकतो. मानवी जीवनात क्षणाक्षणाला काहीना काही घडत असते. काही चांगले काही वाईट घडत असते. या बऱ्या वाईट घटनांच्या अपरिहार्यतेचा विचार करता मैत्री आणि मित्र आवश्यक असतातच.
मंदिरातील मुर्तीला देव मानून जसे आपण आपले मन मोकळे करतो तसेच आपण आपल्या खऱ्या मित्रा जवळही आपले मन मोकळे करतो. आजकाल मैत्रीतही हिशोबीपणा आला आहे. मैत्रीतही स्वार्थ आला आहे. त्यामुळे मैत्रिची पवित्र भावना काळवंडू लागली आहे. स्वार्थाच्या अंधारात मैत्री चाचपडू लागली आहे त्यामुळे मैत्रीतून मिळणारा आनंदही कमी होऊ लागला आहे. स्वार्थी मित्र आपण सहज ओळखू शकतो. स्वतःच्या स्वार्थासाठी जवळ येणारे मित्र आपल्याला संकटकाळात मदत करत नाहीत. जो आपल्याला संकटकाळात मदत करतो तोच खरा मित्र असतो. जीवनाच्या प्रवासात अनेक मित्र भेटतात, निघून जातात पण मनाने जुळलेले मित्र मात्र कायम राहतात. मित्रांमुळे आपल्याला व्यवहार कळतो. अडचणी सुटतात, संकटावर मात करण्याचे धाडस निर्माण होते. मैत्रीमुळे आपली निर्णय क्षमता वाढते. इतकेच काय तर मैत्रीमुळेच माणूसकी जिवंत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. केवळ सहवास म्हणजे मैत्री नव्हे, सहवास आणि मैत्री यात फरक आहे. सहवासाने मैत्री फुलत जाते हे जरी खरे असले तरी मैत्रीसाठी मित्र दररोज जवळ असावाच असे काही नाही. अनेकदा जिवलग मित्र जवळ नसतात. कित्येक दिवस त्यांच्यात बातचीत होत नाही तरीही त्यांची मैत्री कायम असते
४ ऑगस्ट १९५८ रोजी "मैत्री साजरी करण्याचा दिवस." भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस किंवा मैत्री दिन साजरा केला जातो. इ. स. १९५८ पासून पेरुग्वेमध्ये सुरू झालेला हा जागतिक मैत्री दिन उपक्रम दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशात आवर्जून साजरा केला जातो.परंतु मैत्री दिन २५६८ वर्षापूर्वीच गौतम बुद्धांनी सुरू केला आहे तो सर्वाँनी करुणेने वागावे यासाठी.जयमंगल अष्टगाथेच्या ५ व्या गाथेच्या कथेत चिंचा नावाची माणविका गर्भवतीचे सोंग घेउन भगवान बुद्धांवर आरोप करते की मी श्रमण गौतमांपासुन गरोदर आहे पण भगवानांवर तिच्या निंदेचा काहीच परिणाम होत नाही हे पाहुन ती घाबरली आणि तिच्या पोटाला बांधलेला लाकडाचा तुकडा ढिला झाला आणि खाली पडला ते पाहुन तिथे जमलेल्या लोकांनी तिची निंदा करीत तिला लाथाबुक्क्यांनी तुडविण्याचा प्रयत्न केला परंतु महाकारुणीक सम्यक संबुद्ध भगवानांनी त्यांना अडविले आणि तिला मुक्त करायला सांगीतले.बुद्धांच्या जीवनातुन आपल्याला प्रेरणा मिळते की जरी कोणी आपली कितीही निंदा केली तरी जराही विचलीत न होता प्रसंगाला सामोरे जावे.
0 टिप्पण्या