Top Post Ad

झोपडपट्टी चळवळीचा बेमुदत उपोषणाचा इशारा



एच.डी.आय.एल. प्रिमियर, विद्याविहार येथील बांधलेल्या इमारती संदेश नगर व क्रांती नगर, कुर्ला (पश्चिम) येथील प्रकल्पग्रस्त नागरिकांसाठी आहेत पंरतु सद्या एम.एम.आर.डी.ए.ने ३० पैकी फक्त ३ इमारती  दिल्या आहेत. संदेश नगर, क्रांती नगरच्या सर्व झोपड्यांची संख्या ३७४७ असताना फक्त ३ इमारती कशा दिल्या गेल्या ? येथील झोपड्यांची संख्या ४००० पर्यंत आहे तर केवळ ६ इमारती विभागासाठी आरक्षित करुन त्या इमारतींची दुरुस्ती करुन घेण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल आजपर्यंत या विभागातील नागरिकांवर खुप अन्याय झालेला आहे आणि अजूनही तो होत आहे. दोन महिन्यात विधानसभा निवडणुक होत आहे त्यामुळे अश्वासन नको, निर्णय हवा असे जाहिर आवाहन झोपडपट्टी चळवळीचे घनश्याम भापकर आणि अॅड. सुभाष गायकवाड यांनी केले आहे. आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकारांना याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी अनेक रहिवाशी उपस्थित होते. 

 निवडणुकीच्या तोंडावर वीस-पंचवीस कुटुंबांना घरे देण्यात येतात आणि इतरांना पुन्हा पाच वर्षे  वाट पहात बसावे लागते ही तुकड्या-तुकड्यात पुर्नवसनाची संकल्पना नको असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच  एच.डी.आय.एल. विद्याविहार प्रकल्प हा आमच्या नावांवर उभारला त्यामुळे कोणाच्याही मनमानीनुसार इमारतीचे वितरण होऊ देणार नाही. २९ व ३० नं इमारतीत संदेश नगर व क्रांती नगरचे कोणत्याही परीस्थितीत पुर्नवसन झाले पहिजे. लाखो करोडोचा भूखंड केंद्र शासनाला हवा असेल तर मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण (अदानी कंपनी) ला या पात्र व अपात्र झोपड्यांचे पुर्नवसनासाठी लागणारा सर्व खर्च दयावा लागेल. सद्या शासनाच्या निर्णयानुसार ३०० चौ.फु. क्षेत्रफळाचे घर देण्यात येत आहे, परंतु येथील नागरिक २६९ चौ.फु. क्षेत्रफळाचे घर स्वीकारत आहेत. त्यामुळे  पात्र आणि अपात्र झोपडयांचे पुर्नवसन तात्काळ करावे,  २९, ३० इमारतीत त्वरीत पुर्नवसन करा (इमारत ठरवणं येथील रहिवाशांचा अधिकार...) तसेच हस्तांतरण शुल्क - ४०,०००/- सहशुल्क २,५०,०००/- MIAL/ अदाणी कंपनी कडुन घेण्यात यावे. बाधित झोपडीधारकच्या कुटुंबातील एका व्यक्तीला मुंबई अंतरराष्ट्रीय किंवा नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणात शैक्षणिक पात्रतेवर नोकरी देण्यात यावी. या मागण्या येणाऱ्या निवडणुकांपूर्वी पुर्ण व्हायलाच हव्या या करिता आझाद मैदान, मुंबई येथे  ५ ऑगस्ट २०२४ बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा झोपडपट्टी चळवळीचे घनश्याम भावकर यांनी आज दिला.  






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com