Top Post Ad

... तर नक्कीच डोळ्यांचे त्रास कमी होतील - पद्मश्री डॉ. केकी मेहता


शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्याचा संयुक्त प्रयत्न म्हणून रोटरी क्लब ऑफ साऊथ मुंबई  आणि मेहता इंटरनॅशनल आय इन्स्टिट्यूट यांच्या वतीने मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कुलाबा येथील मेहता इंटरनॅशनल आय इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित हे शिबीर क्लबचे अध्यक्ष, वैद्यकीय संचालक आणि रुग्णालयाचे प्रमुख पद्मश्री प्रा.डॉ. केकी आर.मेहता यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले.  प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब साऊथ मुंबईचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर चेतन देसाई, रोटरीयन नर्गिस गौर आणि केतकी निसर  यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. या शिबिरात दक्षिण मुंबईतील विविध शाळांमधील सुमारे ६०० हून अधिक विद्यार्थ्यांची यशस्वी नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना अत्यावश्यक नेत्रसेवा पुरविण्यात आल्या, ज्यामध्ये   विल्सन हायस्कूल, चंदारामजी विद्यालय, कुलाबा महानगर पालिका शाळा, नवोदय केंद्रीय विद्यालय, सुनदत्ता हायस्कूल (ताडदेव) आदी शाळेंचा समावेश होता. या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करीत  रोटरीयन नर्गिस गौर यांनी अल्पोपहार देत त्यांच्याशी संवाद साधला.

तपासणी आणि चष्मा शिबिराचे आयोजन सर्वच ठिकाणी केले जाते मात्र मुलांसाठी असे तपासणी शिबीर होत नाहीत. त्यातच आम्ही मागील दोन वर्षापासून लहान मुलांच्या डोळ्यांच्या तक्रारी बाबत अनुभव घेतोय. त्यात शालेय विद्यार्थी ज्यांची वय ४ आणि १२ वर्षे आहे. त्यांना वाचन करतांना त्रास होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्यामुळे आम्ही या वर्षापासून शाळेच्या मुलांचे मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन केले, वर्तमान आणि भविष्यातील भारताची धुरा यशस्वीपणे पेलणाऱ्या आपल्या नव पिढीने म्हणजेच शालेय विद्यार्थ्यांनी आपले डोळे जपणे फारच गरजेचे आहे. आजच्या युगात मोबाईल ही अत्यंत आवश्यक वस्तू आहे. रस्त्यावरील मच्छी विकणाऱ्याला देखील आपल्या व्यवहाराकरिता मोबाईल वापरावा लागतो. मात्र त्याचा वापर कमी प्रमाणात कसा करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जसे  मोबाईल आणि टीव्हीपासून अंतर बाळगणे, रात्रीच्या अंधारात मोबाईल पाहण्याचे टाळणे. दर वीस ते पंचवीस मिनीटांनी मोबाईल किंवा टिव्हीवरून आपली दृष्टी इतर ठिकाणी केंद्रीत करणे अशा काही गोष्टींचे आपण पालन केले तर नक्कीच डोळ्यांचे त्रास कमी होतील असा विश्वास आहे. -  पद्मश्री डॉ. केकी मेहता  

मोबाईल पाहिल्याने डोळ्यांचे विविध आजार वाढतात. त्यामुळे लहान मुलांचे डोळे पालकांनी स्वतः पुढाकार घेऊन नेत्ररोग तज्ञाकडे मुलांना नेऊन तपासणी करून घ्यावेत. मुलांना मैदानी खेळ जसे धावणे, फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, कबड्डी, खो खो, व्यायाम आणि योगासनांबाबत आवड निर्माण करावी. मुलांना सायकल चालवणे आणि पोहणे शिकवून त्यात त्यांची रुची वाढविणे तसेच मुलांना सकस आहार, फळे, फळ भाज्या यांचा आहारात समावेश असावा. पुस्तके वाचताना किवा फळ्यावरील अक्षरे भुरकट दिसत असल्यास तात्काळ डोळ्यांच्या डॉक्टरांकडे तपासणी करून योग्य उपचार करावेत.- केतकी निसर  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com