Top Post Ad

महिला आयोग प्रमाणेच पुरुष आयोग स्थापन करण्याची भूमिपूत्र फाऊंडेशनची मागणी

देशात ज्या महिलांवर अन्याय अत्याचार होतो त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. परंतु ज्या महिला जाणीवपूर्वक खोटया केसेस करुन महिलांसाठी असलेल्या कायदयाचा दुरुपयोग करतात. खोटया केसेचे प्रमाण ७४% आहे. म्हणजे ७४% पुरुषांना खोटया केसेचा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते काही पुरुष तर मानसिक त्रास सहन न झाल्यामुळे आत्महत्या हि करतात. एका सर्वे मध्येतर अशा खोटया केसेसना कंटाळून देशात रोज १२० पुरुष आत्महत्या करतात असे दिसून आले आहे. स्त्रीयांवर अन्याय नकोच आहे परंतू पुरुषांवर ही अन्याय नको आहे काही ठिकाणी पुरुष चुकताय तर काही ठिकाणी स्त्रीया म्हणून फक्त स्त्री आहे म्हणून दखल घेणे योग्य नाही. पोलीस स्टेशन मध्ये तर स्त्रीचे विरुध्दात पुरुषाची बाजुच ऐकुन घेतली जात नाही. यामुळे पुरुषांना खुप मोठ्या मानसिक त्रासाला, बदनामीला सामोरे जावे लागते आणि यातुन काही पुरुष वेडे होतात. तर काही आत्महत्या करतात म्हणून पुरुषांचे संरक्षणासाठी स्त्रीया प्रमाणेच पुरुष आयोग स्थापन करावा अशी मागणी भूमिपुत्र फाऊंडेशनचे विनोद नाठे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. 

 


देशात ज्या महिलांवर अन्याय, अत्याचार होत असेल त्या महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, परंतु ज्या महिला जाणीवपूर्वक खोट्या नाट्या केसेस करून महिलांसाठी असलेल्या कायद्याचा दुरुपयोग करतात, खोट्या केसेसला वैतागून पुरुषांनाही मोठा मानसिक त्रास सहन कराया लागतो. अनेकदा त्यामुळे पुरुषांकडून तोंड दाखवायला जागा नाही म्हणून आत्महत्या सारखे प्रकार घडतात. मात्र त्यावर कोठेही अधिक वाच्यता होत नाही. ज्या महिलांवर अन्याय, अत्याचार होत असेल त्या महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी सर्वांची भूमिका आहे. परंतु ज्या महिला विनाकारण खोट्या नाट्या केसेस दाखल करतात. त्यामुळे पुरुष यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक महिला ह्या महिलांसाठी असलेल्या कायद्याचा दुरुपयोग करतात. त्यांच्या अशा चुकीच्या वागण्यामुळे खरोखर ज्या महिलांवर अन्याय अत्याचार होतो, त्यांनाही न्याय मिळण्यात त्यामुळे अडचणी निर्माण होतात. पुरुष वर्गाकडेही पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. एखाद्या पुरुषाकडे जर सबळ पुरावे असतील व त्याच्यावर अन्याय होत असेल तर पोलिसांनी त्याची देखील बाजू ऐकून घेतली पाहिजे. मात्र आज पुरुषांचं कुणी ऐकूनच घेत नाही. त्यामुळे चुका नसतानाही अनेकदा पुरुषांना आत्महत्येचा मार्ग निवडावा लागतो. याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. ज्याची चूक झाली त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. परंतु ज्याचा गुन्हा नाही, त्याला विनाकारण शिक्षा होणे, हे सुद्धा अन्याया सारखे आहे

काही महिन्यांपूर्वी एका संस्थेने सर्वे केला होता, त्यामध्ये असे निदर्शनास आले होते की, कौटुंबिक हिंसाचार भादवि कलम ४९८ अशाच प्रकारचे इतर खोटे दावे महिलांकडून पुरुषांवर दाखल होतात. पुरुषांकडे कितीही सबळ पुरावे असले तरी त्यांची बाजू ऐकुण घेण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे नैराश्यपोटी तो पुरुष आत्महत्येचा मार्ग पत्करतो. देशांमध्ये रोज 120 पुरुष आत्महत्या करत असल्याची माहिती या सर्वेमधून पुढे आली आहे. पुरुष एखाद्या प्रसंगांमध्ये रडला तर तो भित्रा, ढोंगी, कपटी, भागुबाई आहे बाईल्यावाणी रडतो असे म्हटले जाते. पण हाच पुरुष समजा चिडला तर बघा तो किती रागीट आहे, तामशी आहे असे म्हटले जाते. पण एखादी महिला रडली तर तिच्यावर किती अन्याय होतोय आणि तीच जर चिडली तर वाघीण कशी चौताळली असे फुशारकीने म्हटले जाते. पुरुष महिलांच्या विरोधात नाही, कारण प्रत्येक पुरुषामागे महिला असते. आई-बहीण, मुलगी, पत्नी असते. मात्र अनेक ठिकाणी महिलांकडून पुरुषांवर खोट्या केसेस करून अन्याय होतो. वेगवेगळ्या कारणातून हे होत असतो. त्यालाही वाचा फुटणे गरजेचे आहे. महिला व पुरुष सर्वांसाठी कायदा समान आहे. मग आपल्या देशामध्ये सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी अधिक सुदृढ नियम कायद्याचा विचार झाला पाहिजे. जेणेकरून महिलांवर व पुरुषांवरही अन्याय होणार नाही. यासाठी महिलांप्रमाणेच पुरुषांच्या संरक्षणासाठी व होणाऱ्या आणण्यासाठी देशांमध्ये पुरुष आयोग स्थापन करावा, अशी मागणी भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद नाटे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com