राज्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे आमदार मनीषा कायंदे, आमदार नमीता मुंदडा आदी उपस्थित होत्या. राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये भगवान परशुराम आर्थिक विकास मंडळ मंजूर करण्यात आले. अमृत संस्था कायम ठेवून येत्या कॅबिनेटमध्ये आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. या अनुषंगाने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने ब्राह्मण समाजासाठी आता अमृत संस्थेच्या सर्व लाभांबरोबरच स्वतंत्रपणाने आर्थिक विकास महामंडळ ही स्थापन करण्यात आले आहे. या महामंडळाला ५० कोटी रुपये इतकी भरीव निधीची तरतूदही राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. परळी वैजनाथ येथे 25 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मण समाज संघटनांना एकाच व्यासपीठावर आणून परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी या मागणीकरिता ब्राह्मण ऐक्य परिषद घेतली होती. ब्राह्मण समाजाचे नेते बाजीराव धर्माधिकारी, निखिलजी लातूरकर, दीपक रणवरे, मकरंद कुलकर्णी, विश्वजीत देशपांडे, सुरेश मुळे, सचिन वाडे पाटील, गजानन जोशी, अर्चना सरुडकर, संजीवनी पांडे, विजया कुलकर्णी यांच्यासह अनेक समाज बांधवांनी वेळोवेळी प्रयत्न केले. असे म्हणत सरकारचे आभार समस्त ब्राम्हण समाज महाराष्ट्र समन्वयक प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी मानले
सोमवार २३ सप्टेंबर रोजी मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
- लोहगाव विमानतळाचे नाव ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे करण्याचा निर्णय
- बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना : शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी
- धान उत्पादकांना दिलासा : आता प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
- कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश
- जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय
- शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग. १४८६ कोटीचा प्रकल्प
- करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा
- यवतमाळ, जळगांव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते
- क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड
- ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद
- राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ
- मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम; राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प
- हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार
- एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार : साठ वर्षाचा भाडेपट्टा करार
- ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ
- राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ
- राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण
- छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये
- अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा
- जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी
- श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार
- दूध अनुदान योजना सुरु राहणार. उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान
- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर
0 टिप्पण्या