टाळ आणि डफच्या सोबतीने " थांबवू स्त्री अत्याचार " हया पथनाट्यातून स्वयंसेवकांनी १५१ गणेश उत्सव मंडळांमध्ये समाज प्रबोधन करण्यात आले. सध्याची परिस्थिती पाहता स्त्रियांवरील अत्याचार हे खूप प्रमाणात वाढले आहेत आणि त्यावर सर्वच क्षेत्रांतून आवाज उठवला जातोय. कायदे इतके कडक असून सुद्धा आजही स्त्री अत्याचारांचे प्रमाण कमी होत नाही यासाठी च किर्ती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने कीर्तीजागर ह्या उपक्रमातून थांबवू स्त्री अत्याचार हे पथनाट्य सादर करून समाजात स्त्री पुरुष समानतेसाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
या पथनाट्यातून आपण आपल्या मुलांवर समानतेचे संस्कार करावेत असा संदेश देण्यात आला. हे पथनाट्य सादर करताना कीर्ती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ३८ स्वयंसेवकांनी त्याच सोबत काही माजी विद्यार्थ्यांनी तीन ग्रुप करत संपूर्ण मुंबईभर १५१ पथनाट्यांची पूर्ती केली . ह्यात वेदांग भोपी , श्रीकांत रेणूसे, कुणाल म्हात्रे आणि सुदर्शन जाधव ह्या वादकांनी ही डफ च्या सोबतीने त्यांना साथ दिली. एकूण सर्व स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमानंतर कीर्ती जागर ह्या उपक्रमातून गणेशोत्सवात १५१ मंडळांमध्ये १५१ वेळा पथनाट्य सादर करून समाज प्रबोधन करण्यात आले.
- ओमकार वाक्कर
- एन एस एस स्वयंसेवक
- एफ वाय बी ए
- कीर्ती महाविद्यालय
0 टिप्पण्या