Top Post Ad

DRPPL चा भूमिपूजन कार्यक्रम रद्द

 *धारावी बचाव आंदोलनाने तीव्र आंदोलनाचा इशारा देताच, DRPPL चा भूमिपूजन कार्यक्रम रद्द!*


गुरुवार दिनांक १२/०९/२०२४ रोजी, सकाळी १०.३० वाजता, RPF ग्राउंड, रेल्वे कॉलनी, माटुंगा, मुंबई - १९ याठिकाणी DRPPL ने भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रस्तावित केला होता. धारावी बचाव आंदोलनाने तीव्र आंदोलनाचा इशारा देताच,  DRPPL ने भूमी पूजनाचा कार्यक्रम रद्द केला आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे धारावी बचाव आंदोलनाने वेळोवेळी विविध आंदोलनात्मक कृती आणि निवेदनाद्वारे अनेक न्याय्य मागण्या केल्या आहेत. या मागण्यांकडे पूर्णपणे डोळेझाक करून या फसव्या योजनेच्या भूमिपूजनाचा घाट घातला जात होता.

प्रकल्पाचा मास्टर प्लॅन जाहीर करण्यात आलेला नाही. पात्रतेची अट रद्द करून घराच्या बदल्यात घर आणि दुकानाच्या बदल्यात दुकान धारावीतच मिळेल याची हमी देणारा शासन निर्णय अजून झालेला नाही. धारावीतील बहुतांश लोकांना अपात्र ठरवून त्यांना धारावी बाहेर हुसकावून लावण्याचा व धारावीच्या ठिकाणी दुसरी BKC वसवण्याचा हा डाव असल्याचा आमचा आरोप आहे. 

शासनाच्या मदतीने अदानी दामटू पाहत असलेल्या या फसव्या योजनेचा भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द करावा, या मागणीकरिता आज बुधवार दिनांक ११/०९/२०२४ रोजी, लेबर रेस्टॉरंट समोर, माटुंगा लेबर कॅम्प, मुंबई - १९. याठिकाणी लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले होते, या उपोषण आंदोलनाची दखल घेऊन DRPPL ने भूमी पूजनाचा कार्यक्रम रद्द केला असला तरी, यापुढेही जेव्हा कधी हा कार्यक्रम आयोजित केला जाईल, तेव्हा तो कार्यक्रम पूर्ण ताकदीने उधळून लावला जाईल, असा इशारा यावेळी बोलताना खासदार अनिल देसाई यांनी DRPPL प्रशासनाला दिला आहे.

आजच्या लाक्षणिक उपोषण कार्यक्रमात माजी आमदार बाबुराव माने, शेतकरी कामगार पक्षाचे भाई अड. राजेंद्र कोरडे, साम्या कोरडे, आम आदमी पक्षाचे ऍड. संदीप कटके, पॉल राफेल NCP-SP चे उल्लेश गजाकोष, हलिमा अंसारी CPI चे कॉ. नसिरुल हक, CPM चे वसंत खंदारे, शैलेंद्र कांबळे काँग्रेसचे अब्बास हुसैन, दीपक खंदारे सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा साळवी सह सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com