Top Post Ad

महाराष्ट्रातील प्रागतिक पक्षांतर्फे भव्य राज्यव्यापी परिषद


 बुधवार, १६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे भव्य राज्यव्यापी परिषद आयोजित करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्रातील प्रागतिक पक्षांच्या च्या वतीने घेण्यात आला आहे . आज १३ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील प्रागतिक पक्षांच्या मुंबईत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत असे जाहीर करण्यात आले. नाशिकच्या ह्या परिषदेत येत्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने पर्यायी जनताभिमुख धोरणे जाहीर करावीत आणि प्रागतिक पक्षांसोबत जागा वाटपाबाबत सन्मानपूर्वक तडजोड करावी अशी आग्रही मागणी करण्यात येईल. महाविकास आघाडीच्या नेतृत्वासोबत चर्चा करण्यासाठी माजी आमदार जयंत पाटील, आमदार अबू असीम आझमी, डॉ. अशोक ढवळे व डॉ. भालचंद्र कानगो या चार सदस्यांच्या समितीची नेमणूक करण्यात आली.  या बैठकीत समाजवादी पक्षातर्फे मेराज सिद्दीकी व राहुल गायकवाड, भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे डॉ. भालचंद्र कानगो, सुभाष लांडे, प्रकाश रेड्डी, राजू देसले, प्रा. राम बाहेती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे डॉ. अशोक ढवळे, किसन गुजर, डॉ. एस. के. रेगे, शैलेंद्र कांबळे, आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षातर्फे किशोर ढमाले तसेच  शेतकरी कामगार पक्षातर्फे माजी आमदार जयंत पाटील, प्रा. एस. व्ही. जाधव व राजेंद्र कोरडे हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com