Top Post Ad

ही महाराष्ट्राच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी घटना

राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर बेछूट गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला सुन्न करणारी आहे. वाय दर्जाची सुरक्षा असलेल्या लोकप्रतिनिधीला वांद्र्यासारख्या भागात खुलेआम गोळ्या घातल्या जातात ही गंभीर बाब आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे कुठे? असा संतप्त सवाल करत भाजपा-शिंदे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मुंबईसह महाराष्ट्र जंगलराज बनले आहे, अ बाबा सिद्दीकी यांना धमक्या येत होत्या व त्यासंदर्भात त्यांनी तक्रारही केली होती, त्यांना सुरक्षा होती तरीही हत्या केली. महाराष्ट्रात लोकप्रतिनिधीही सुरक्षित नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री काय करत आहेत. शिंदे फडणवीसांच्या राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही, गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. बलात्कार, खून करून आरोपी फरार होतात. लोकप्रतिनिधी हे जनतेसाठी काम करत असतात, जिथे लोकप्रतिनिधीच सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्यांचे काय ? महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला शिदे-फडणीसच जबाबदार आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने राज्याच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली असल्याचे  खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. 


 देवेंद्र फडणीस हे निष्क्रिय, बेजबादार व अकार्यक्षम गृहमंत्री असून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे थोडीही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी फडणवीस यांची तात्काळ हकालपट्टी करावी. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. कायद्याचे पालन करणारे राज्य जंगलराज  बनले आहे. गेल्या वर्षभरात मुंबईतच लोकप्रतिनिधींवर गोळ्या झाडल्या जाण्याची ही तिसरी घटना आहे. महाराष्ट्रात जे घडत आहे ते अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे. वाढत्या गोळीबाराच्या घटना, गुंडांनी मंत्रालयाच्या आवारात रिल्स बनवणं आणि सीएम व डीसीएमसोबत फोटो काढणे, सामाजिक ध्रुवीकरण आणि हिंसेचे राजकारण वाढणे या सर्व गोष्टींमुळे गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढले आहे. वाय दर्जाची सुरक्षा असलेल्या व्यक्तीची जर रस्त्यावर गोळ्या घालून हत्या केली जात असेल तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेची काय अवस्था? राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता महामहिम राज्यपाल यांनीच हस्तक्षेप करावा व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

मुंबईतील वांद्रे परिसरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन राऊंड गोळीबार करण्यात आला. यात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. गोळीबार कोणी केला याची अद्याप पुष्टी झालेली नाही. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गुंडांनी गोळीबार केला. मुंबईच्या बांद्रा पूर्वेत खैर नगर परिसरात ही घटना घडली आहे. घटनास्थळी निर्मलनगर पोलीस पोहोचले असून तपास करत आहेत. 
काही महिन्यांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांनी यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता.  66 वर्षीय बाबा सिद्दीकी एकदा मंत्री तर तीन वेळा वांद्रे पश्चिमचे आमदार राहिले आहेत. त्यांचा मुलगा झीशान हा वांद्रे पूर्वचा आमदार आहे.  मुंबई युवक काँग्रेसचे प्रमुख आहेत. बाबा सिद्दीकी चार दशकांहून अधिक काळ काँग्रेसशी संबंधित होते. 

मूळचे बिहारचे असलेले बाबा सिद्दिकी यांनी 1990 च्या दशकात मुंबईत निवडणुकीचे राजकारण सुरु केले.1992 मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1997 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. बाबा सिद्दीकी 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये ते पुन्नाबाबा सिद्दीकी या काळात मंत्रीही होते. बाबा सिद्दीकी हे त्यांच्या बॉलिवूड कनेक्शनसाठी ओळखले जातात. सलमान आणि शाहरुख दोघेही त्याच्या इफ्तार पार्टीत एकत्र आले होते. बाबा सिद्दीकी यांच्या राजकारणातील उदयामागे दिवंगत सुनीत दत्त यांचे योगदान असल्याचे मानले जाते. सुनीत दत्तनंतर बाबा सिद्दीकी त्यांचा मुलगा संजय दत्त आणि मुलगी प्रिया दत्त यांच्या खूप जवळ साहेत. 2017 मध्ये ईडीने बाबा सिद्दीकी यांच्यावर छापा टाकला तेव्हा त्यांनी त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याला पुढे केले होते. 2019 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com