तीन सरन्यायाधीश आपल्या कारकिर्दीत लोकशाहीला न्याय देऊ शकले नाहीत. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. तिला समोर कोण आहे दिसत नसतं. आक्रोश तिच्या कानावर पडत असतो, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अद्यापही सुनावणी झाली नाही. याप्रकरणी तारखांवर तारखा मिळत आहेत. कोणत्याही क्षणी निवडणूका जाहीर होऊ शकतात. यानंतर न्याय मिळाला तरी तो काय उपयोगाचा, शेवटचा श्वास असेपर्यंत मी शाहु फुलेंचा महाराष्ट्र मोदी शहांचा होऊ देणार नाही, असा विश्वास आज दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी दिला. भाजपचं गोमुत्रधारी नेतृत्त्व मी नाकारलं. त्यामुळे त्यांना लाथ मारली. शिवसेना आणि ठाकरेंना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही ज्यांना मोठं केलं, त्यांनीच पक्ष फोडला. पण शिवसैनिकांमुळे आजही मी इथे उभा आहे. तुमचं पाठबळ नसतं, तर मी उभाच राहू शकलो नसतो, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.
आज दसरा आहे. आज शस्त्रांची पूजा करतात. मी तुमची पूजा करतो. कारण तुम्ही माझी शस्त्रं आहात, केंद्राची सत्ता, सगळ्या यंत्रणा शिवसेनेला आणि ठाकरेंना नेस्तनाबूत करायला आलेल्या असताना माझी वाखनखं माझ्या सोबत होती. त्यांच्या किती पिढ्या यायच्या त्या येऊ देत. त्यांना गाडून त्यांच्या छाताडावर भगवा फडकवून दाखवेन, अशा शब्दांत ठाकरेंनी विरोधकांना सुनावले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सकाळी सांगितलं, हिंदूंनो स्वसंरक्षणासाठी एकत्र या. केंद्रात १० वर्षांपासून मोदी सत्तेत आहेत. तरीही हिंदू खतरे में असेल तर मग कशाला हवेत मोदी, असा सवाल ठाकरेंनी केला. भाजपला जेव्हा कोणीच विचारत नव्हतं, तेव्हा आम्ही यांना हात दिला, खांद्यावर घेतलं. त्यामुळे हे आमचंच पाप आहे. आता भाजपला खांदा देण्याची वेळ आली असल्याचे ठाकरे म्हणाले.
तसेच यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना शपथ दिली. राज्य लूटारूंच्या हाती जावू देणार नाही मी शपथ घेतो की महाराष्ट्रात अंधकार घडवणाऱ्या दिल्लीतील शहांना रोखण्यासाठी मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मशाल बनून लढत राहील. मी शपथ घेतो की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत शिवशाही महाराष्ट्रात आणण्यासाठी हीच मशाल धगधगत ठेवेन. मी एक स्वाभिमानी महाराष्ट्र प्रेमी म्हणून शपथ घेतो की, 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेला महाराष्ट्र मी लुटारू आणि दरो़डोखोरांच्या हाती जाऊ देणार नाही. मी शपथ घेतो की, छत्रपती शिवराय आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट उभी केली. ती मी अभेद्य ठेवेन. मी शपथ घेतो की महाराष्ट्रात अंधकार घडवणाऱ्या दिल्लीतील शहांना रोखण्यासाठी मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मशाल बनून लढत राहील. मी शपथ घेतो की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत शिवशाही महाराष्ट्रात आणण्यासाठी हीच मशाल धगधगत ठेवेन अशी शपथ उद्धव ठाकरे यांनी घेतली.
'आज त्यांनी जाहिरात केली आहे. काय लिहिलंय त्यात? हिंदुत्व आमचा श्वास. मराठी आमचा प्राण, आता यापुढचं मी तुम्हाला सांगतो. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण.. अदानी आमची जान आणि आम्ही शेठजींचे श्वान,' हे शेठजींचे श्वान आहेत, शेपूट हलवणारे. मी कुत्र्यांचा अपमान करु इच्छित नाही. मी श्वानप्रेमी आहे. पण मी लांडगाप्रेमी नाही. सध्या लांडगे वाघाचं कातडं घालून फिरत आहेत. ते करताना त्यांचं काय काय उघडं पडतंय, हे त्यांना माहीत नाही' तीन लाख कोटी सरकारने कंत्राटदारांवर उधळले आहेत. राज्य सरकारची कर्ज घेण्याची मर्यादा असते. ते कर्ज काढून फटाके फोडत आहेत. सर्व समान्यांना दिवाळी साजरी करत असल्याचे दाखवत आहेत. आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती गंभीर आहे. अदाणींना बरंच काही दिलं आहे. चंद्रपूरच्या खदाणी, शाळा, धारावी, मिठागरे हे सर्व या सरकारने अदाणींना दिले. रक्त सांडवून आम्ही मुंबई मिळवली आहे. ही अदाणींनी भेट म्हणून दिलेली नाही, अदानींच्या हातात मुंबईत देत असाल तर आमचं सरकार आल्यावर आम्ही धारावीचं कंत्राट रद्द करू, आम्ही तिथे पोलिसांना जागा देईल. वांद्रेची जागा आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना दिली होती. मात्र, शिंदेंनी ही जागा कोर्टाला दिली. आमचं सरकार आल्यावर आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना जागा देऊ, असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले.
0 टिप्पण्या