Top Post Ad

ठाण्यामध्ये १९ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय शिक्षण स्नेहमेळाव्याचे आयोजन

  ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ३ वाजता काशिनाथ घाणेकर सभागृहात  मुंबई, ठाणे, नवी मुंबई व आसपासच्या परिसरातील शिक्षकांचा राज्यस्तरीय स्नेह मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यामध्ये राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, टीचर ऑफ द ईअर, प्रिन्सिपल ऑफ द ईअर, आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या शिक्षकांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास अंदाजे ११०० हुन अधिक शिक्षक उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे आयोजन ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांनी केले आहे, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ विशाल कडणे आहेत. 

  सदर कार्यक्रमाची सुरुवात "स्मार्टफोनचे दुष्परिणाम आणि घरातील सुसंवाद" ह्या चर्चासत्राने होईल. त्यानंतर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ आणि निबंध वाचनाचा कार्यक्रम आहे. वर्ष २०२३ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या १११ शिक्षकांचा सन्मान देखील ह्या कार्यक्रमात केला जाणार आहे. जीवन गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक, सर्वोत्कृष्ट विषय शिक्षक इत्यादी विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन आहे. स्मार्टफोन दुरुपयोगापासून तरुणाईला परावृत्त करणे आणि सर्वांना मराठी भाषेचा, अक्षरांचा लळा लावणे इत्यादी लोकोपयोगी वृत्तींचा प्रचार करणाऱ्या "आज्जीबाई जोरात" नाटकाची टीम शिक्षकांसोबत संवाद साधेल. 

कार्यक्रमात आजीबाई जोरातचे टीम सदस्य अभिनेत्री निर्मिती सावंत, सिंघम सिनेमा लेखक क्षितिज पटवर्धन, अभिनेता जयवंत वाडकर, पुष्कर श्रोत्री विशेष निमंत्रित आहेत. गृहनिर्माण चळवळीतील युवा नेतृत्व मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशन संचालक डॉ विशाल कडणे कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात सोमैया विद्यापीठाचे अधिष्ठाता, डॉ गजानन रत्नपारखी, ठाण्याचे कमलेश प्रधान, सरस्वती समूहाच्या वर्षा सावंत, डी वाय पाटील विद्यापीठाचे विविध दिग्गज आणि शिक्षण क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विविध साहित्यिक , लेखक, पत्रकार श्री किरण शेलार, सिंघम अगेन दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन, सिनेनिर्माते दिलीप जाधव कार्यक्रमात प्रमुख वक्ते आहेत. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री नेहा परांजपे करतील. मुंबई, नवी मुंबई, ठाणे व आसपासच्या परिसरातील शिक्षकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती कार्यक्रम संयोजक विशाल कडणे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com