Top Post Ad

बुद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीच्या कार्यक्रमात ठाण्यातील सर्व गटातटातील आंबेडकरी नेते एका मंचावर


 बुद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती च्या वतीने  सिडको येथील बुद्धविहारात या वर्षी धम्म चक्र प्रवर्तन दिन  मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. दिनांक 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमी निमित्त ठाण्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना एका मंचावर आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे समितीची अध्यक्ष रवि चांगो शिंदे यांनी कळविले आहे. 
दिवंगत चांगो शिंदे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी नेहमीच  सदर समितीच्या वतीने दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. या कार्यक्रमांना ठाण्यातील वेगवेगळ्या गटातील आंबेडकरी नेतेच नव्हे तर इतर पक्षाचे मान्यवर मंडळी देखील उपस्थित रहात असत. तेच वैभव या परिसराला पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी या वर्षी या ठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील आणि ठाणे शहरातील सर्व आंबेडकरी जनतेला उपस्थित राहण्याचे आवाहन या द्वारे करीत असल्याचे रवि शिंदे यांनी म्हटले आहे.  तसेच यावेळी नविन समितीची नावे जाहीर करण्यात येणार असून तसा ठराव नुकताच समितीच्या बैठकीत मंजूर झाला आहे. त्याला समितीच्या सर्व सभासदांना एकमताने मंजूरी दिली असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.  


बुद्धविहाराविषयी थोडेसे......

बुद्धविहार बनविण्यासाठी बौध्द धम्म चक्र प्रवर्तन समिती मार्फत बुद्धविहार बनविण्याची कल्पना चांगो शिंदे यांना सुचली व त्यासाठी महात्मा फुले नगर, खारटन रोड, ठाणा कॉलेज समोरील सरकारी जागा समितीच्या ताब्यात घेतली. त्यानंतर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉल, बुद्धविहाराचे स्तुप, वाचनालय, कार्यालय, व्यायाम शाळा असे छोट्या प्रमाणात बांधण्यात आले. त्याचे उद्घाटन करण्यास भारतीय बौध्द महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय महाऊपासिका मिराताई आंबेडकर तसेच साथी जॉर्ज फर्नांडीस हे आले होते. त्यावेळेस इतर समाजातील राजकीय नेते सुध्दा होते. 
1986 साली त्यातील काही भाग जिल्हाधिकारी, ठाणे यांची परवानगी न घेतल्यामुळे त्यांच्या कार्यालयाकडून तोडण्यात आला. या संदर्भात जनआंदोलन झाले, मोर्चे काढण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर 7 दिवस, 5 दिवस, 3 दिवस असे उपोषण करण्यात आले.  परंतु त्याला यश आले नाही. सन 2001 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख असतांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला. त्यावेळेस तत्कालिन जिल्हाधिकारी चहल व उपजिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी चांगो शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत  चर्चा करून नविन प्रपोजल सादर करण्यास सांगितले. दरम्यान तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सरकार बदलले आणि  सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले. मग सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयात याबाबत पाठपुरावा करण्यात येत होता. बुद्धविहाराच्या कामाला त्यांनीही प्राधान्य देवून लक्ष घातले. मात्र पुन्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. त्यांनीही या कामी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यावेळी. मा. छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याशी देखील याबाबत समितीच्या माध्यमातून चर्चा सुरु होती. इतकेच नव्हे तर  अजित पवार जलसंपदा मंत्री,  गणेश नाईक, पालकमंत्री ठाणे जिल्हा यांच्याकडेही या प्रश्नाची बाजू मांडली. त्यांनी हा प्रश्न कॅबीनेटपुढे आणला. त्यानंतर युतीचे सरकार आले. नारायण राणे मुख्यमंत्री होते.त्यांनी देखील या कामी सहकार्य केले. 
तत्कालिन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी  या प्रश्नास प्राधान्य देवून सहकार्य दिल्यामुळे सदर ठराव कॅबीनेटसमोर पास झाला. त्यामुळे  17 लाख रुपये जमिनीची किंमत लावण्यात आली होती ती रु 3, 36,000/- वर आणली गेली. 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारने बौध्द धम्म चक्र प्रवर्तन समितीला मंजुर केलेली 10 गुंठे जागा 13 एप्रिल 2006 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त  महसूलमंत्री यांचेकडे बोलवून महसूल खात्याकडून मंजुरी आदेश देण्यात आला. त्यानंतर वर्षभराच्या काळामध्ये स्थानिक पातळीवर महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय असलेल्या कायदेशीर बाबींच्या अडचणी संबंधीत अधिकाऱ्याना भेटून त्या मार्गी लावण्यात आल्या. २००८ च्या २० मार्च रोजी सदर जागेवर सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते नियोजित बुद्धविहाराचा भूमिपूजन समारंभ झाला.  त्यानंतर हे बुद्धविहार होणे अपेक्षित असतानाच समितीमध्ये अंतर्गत वाद होऊन हे काम ठप्प झाले. मधल्या काळात समितीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. इतकेच नव्हे तर बुद्धविहाराचा ध्यास घेतलेले समितीचे सर्वेसर्वा चांगो शिंदे यांचेही अकाली निधन झाले. त्यामुळे काही काळाने त्या ठिकाणी स्थानिक रहिवाशांनी छोटीशी बुद्धप्रतिमा स्थापन केली. त्यानंतर या ठिकाणी खुल्या स्टेजवर मोठी बुद्धमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र ही जागा अद्यापही मोकळी असल्याने अतिक्रमणाला सामोरे जावे लागत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com