महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात दादासाहेब फाळके चित्रगरीत सुशासन सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. हा सुशासन सप्ताह दि. २२ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होणार असून २९ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या आठवड्यात विविध मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जाणार आहेत, ज्यात प्रशासन, माहिती अधिकार, आर्थिक विषय आणि ई-गव्हर्नन्स यावर चर्चा होणार आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या हस्ते दि. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. यावेळी त्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
त्याच दिवशी दुपारी ३ वाजता कार्यासन अधिकारी (पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय ) चे अनिरुध्द देशपांडे प्रशासकीय कार्यपद्धतीविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर, २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता प्रविण जिदम हे माहिती अधिकार अधिनियम २००५ बाबत मार्गदर्शन करणार आहेत. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता आर्थिक आणि खरेदी अधिकार याविषयावर दीपा देशपांडे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. अभिलेख व्यवस्थापन याविषयावर मनोज दि. राजपूत, (अभिलेखाधिकारी संकलन /प्रकाशन ) आणि भ. क. गवळी (संशोधन सहाय्यक संचालक, पुरभिलेख संचलनालाय ) २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता मार्गदर्शन करणार आहे. डॉ. धनंजय सावळकर (सह व्यवस्थापकीय संचालक ) हे २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता व्यक्तिमत्व विकासाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तर ई-गव्हर्नन्स आणि माहिती तंत्रज्ञान विषयावर २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता अनय पिपंळखूटे (केपीएमजी सल्लागार ) उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
महामंडळातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सत्रांमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी केले आहे.
जनसंपर्क विभाग ... दादासाहेब फाळके चित्रनगरी
https://www.youtube.com/watch?v=woK8fOnG8Xs
0 टिप्पण्या