घरेलु कामगार महिलांच्या कामाला समाजात आणि सरकार दरबारी सन्मान मिळावा म्हणून जागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य घर कामगार युनियनच्या वतीने १० ऑक्टोबर रोजी पवई आय आय टी येथे पदयात्रा,पोस्टर प्रदर्शन आणि मानवी साखळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.युनियनच्या वतीने सुनंदा नेवसे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.असंख्य घर कामगार महिलांनी यात सहभाग नोंदवला.७ ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय सन्मान जनक कामाच्या दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
घरेलु कामगार महिलांनी हातात पोस्टर घेऊन,घोषणा देऊन आपल्या मागण्याचा जागर मांडला होता.घरेलु कामगार कायदा करण्यात यावा.घरेलु कामगार महिलांच्या अधिकार आणि विकास कामांसाठी त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्यात यावे,घरेलु कामगार महिलांची योग्य आणि जलद नोंदणी व्हावी,त्यांना पेन्शन मिळावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
लोकांचे दोस्त रवि भिलाणे,पोपट सातपुते,प्रकाश कांबळे,रमाई बुध विहारचे भाऊ पंडांगळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कल्पना घोक्षे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.
----------------
0 टिप्पण्या