Top Post Ad

या जगात सर्वात 'महामूर्ख जमात म्हणजे हिंदू

जगाच्या पाठीवर असंख्य देशांनी आक्रमण केलेला बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे. आतापर्यंत 76 राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमणं केली. हिंदू-मुस्लिम भाई-भाई, हिंदी-चिनी भाई-भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला. हिंदू-मुस्लिम भाई-भाई, हिंदुंना शत्रू कोण, वैरी, वाईट कोण, चांगलं कोण हे कळत नाही. या जगात सर्वात महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात आहे', तर राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूद्र आहे. हे भुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत. असं स्पष्ट वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले.  नवरात्रौत्सवानिमित्त सांगलीतील शिवप्रतिष्ठान  दुर्गामाता दौडला आजपासून सुरुवात झाली संभाजी भिडे यांनी या दौडीमध्ये धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना हिन्दूंवर जोरदार टीका केली आहे. 

गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्र उत्सवात दांडिया हिंदू समाजाला गांडूपणाकडे घेऊन चालला आहे. हे सर्व नाही चालणार.  माताभगिनींनी स्वतंत्र दौड काढावी, मात्र या दौडीत महिलांना प्रवेश मिळणार नाही, नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही. काही माता भगिनींची इच्छा झाली दौडीत सहभगी होण्याची... हे स्वभाविक आहे. परंतु पाच वर्षाची मुलगी देखील दौडीत सहभागी होणार नाही. महिलांसाठी स्वतंत्र दुर्गा दौड काढायची, मात्र या दौडीत यायचे नाही. याचा बट्ट्याबोळ आणि वाटोळ आपल्याला करु द्यायचे नाही. सगळे सामाजिक कार्यक्रम आहेत. ते करमणूक, मिरवणूक आणि मिळवणूक यासाठी राबवले जात आहे. आपल्याला त्या दौडीचा नाश करु द्यायचा नाही. मी पोलिस अधिकाऱ्यांना सूचवणार आहे की, आम्ही जनवारे आणि आमच्या पाठीवर हाकत चालले गुराखी असे पोलीस लोक आहेत. पोलीसांनी डोक्याला घातलेच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी धावलेच पाहिजे ही दुर्गा माता दौड आहे.  या जमावात धावलेच पाहिजे,  असे देखील  संभाजी भिडे  म्हणाले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com