Top Post Ad

कीर्ती महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम .... सामाजिक जागर नवरात्रीचा

कीर्ती महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग नेहमीच नवनविन सामाजिक उपक्रम राबिण्यासाठी तत्पर असते. असाच एक आगळावेगळा उपक्रम म्हणजे नवकीर्ती! हा उपक्रम कीर्ती महाविद्यालय 2017 सालापासून करत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर समाज प्रबोधन करण्यात येते.  यावर्षी ही ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर ह्या नऊ दिवसांमध्ये नऊ विविध विषयांवर सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले.

 रंग पिवळा (३ ऑक्टोबर)-  या दिवशी उपक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्याचसोबत पिवळा रंग हा  नवचैतन्याचा आणि उज्वल भवितव्याचा प्रतीक असल्यामुळे ह्यादिवशी प्राध्यापक श्रद्धा पडियार यांनी सर्वांना महाविद्यालयीन आयुष्यात आपण आपला दृष्टिकोन सकारात्मक करून कशी उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करायची ह्यावर मार्गदर्शन केले.

रंग हिरवा (४ ऑक्टोबर) - हिरवा रंग म्हटलं की डोळ्यासमोर निसर्ग येतो. ह्यालाच उद्देशून स्वयंसेवकांनी महाविद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी प्राश दादा आणि सोपानमामा ह्यांच्याकडून वृक्ष संवर्धनाचे धडे घेतले सोबतच भटक्या जनावरांना अन्नदान ही केले.

रंग राखाडी (५ ऑक्टोबर)- गुगलच्या अनुषंगाने राखाडी रंग हा मानसिक नैराश्येच प्रतीक आहे असे दिसून आले आणि मानसिक नैराश्य ही आजच्या काळात एक भीषण समस्या झाली असून त्यापासून दूर कसे राहता येईल ह्यावर प्राध्यापक जान्हवी सोमण यांनी प्रबोधनपर व्याख्यान दिले त्याचसोबत स्वयंसेवकांनी दादर रेल्वेस्थानकावर ह्याबाबत पोस्टर प्रदर्शन करत जनजागृती ही केली.

रंग नारंगी (६ऑक्टबर)-  शौर्य आणि पराक्रम याचे प्रतीक असणाऱ्या नारंगी रंगाच्या दिवशी  सर्वांमध्ये इतिहासाबद्दल ची आस्था वाढावी म्हणून आम्ही छत्रपति शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाला भेट दिली त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शौर्य ह्या विषयावर स्वयंसेवकांनी निबंध लेखन ही केले.

रंग पांढरा (७ऑक्टोबर)-  शुद्धता आणि शांतीचे प्रतीक असल्यामुळे ह्या दिवशी नवदुर्गांच्या माध्यमातून नऊ संदेश नशामुक्तीवर  देण्यात आले त्याचसोबत पोलीस अधिकारी पी.एस.आय सोनाली अशोकराव मिरकले ह्यांनी स्वयंसेवकांना नशेपासून दूर कसे ठेवायचे याबाबत मार्गदर्शन ही केले . स्वताला नशेच्या आहारी न घालवता आपण आपले आरोग्य शुध्द ठेवले पाहिजे हा संदेश ह्या दिवसातून देण्यात आला.

रंग लाल (८ऑक्टोबर) - सध्याची परिस्थिती पाहता आजकाल महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यापासून बचाव करण्यासाठी मुलींना स्व-संरक्षण करता आले पाहिजे . ह्याच उद्देशाने आम्ही स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. वैशाली भागवत, सिद्धी श्रीपती आणि रसिका फणसे यांनी हे प्रशिक्षण दिले मुलींचे सबलीकरण हा ह्या मागचा मुख्य हेतू होता.

रंग निळा (९ऑक्टोबर)-  ह्या दिवशी स्वयंसेवकांनी सायन आणि दादर भागातील लोकांना जाऊन स्वच्छता आणि आरोग्य विषयी माहिती देवून जनजागृती केली. स्वतःची काळजी घेवून आपण स्वतःला कसे आजारांपासून दूर ठेवू शकतो हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न स्वयंसेवकांनी केला. 

रंग गुलाबी (१०ऑक्टोबर)- लाल आणि पांढऱ्या रंगाचे मिश्रण असलेल्या गुलाबी रंगाच्या दिवशी स्वयंसेवकांनी नवरात्री मंडळांमध्ये अन्नातली भेसळ कशी ओळखावी आणि भेसळयुक्त अन्नापासून कसे दूर राहावे यासाठी काही प्रात्यक्षिक दाखवून सर्वांचे प्रबोधन केले.

रंग जांभळा (११ऑक्टोबर) - नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्यामुळे ह्या दिवशी चित्रपट प्रदर्शनाच्या माध्यमातून लिंगभेदा-विरुद्ध  प्रबोधन मावा संस्थेचे समन्वयक प्रवीण थोटे यांनी केले. सोबतच एका कलाविष्कारतून सर्व पातळींवर काम करणाऱ्या स्त्रियांना सलाम करण्यात आला आणि महिला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांच्याप्रती ही आदराची भावना दर्शवण्यात आली.

नवरात्रीचे नऊ दिवस झाल्यावर दसऱ्याचे ही विशेष महत्त्व असते. हा दिवस सकारात्मकतेने नकारात्मकतेवर मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी करत असल्यामुळे सोबत सर्वांनी पारंपरिक पोशाख घालत एकत्र येऊन एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा ही दिल्या. सोबतच स्वयंसेवकांनी दसरा फक्त एकमेकांसोबत साजरा न करता  कीर्ती महाविद्यालय ते दादर स्थानक आणि त्या आजूबाजूच्या परिसरात गोरगरिबांना मिठाईचे वाटप केले अशाप्रकारे सर्वांसोबत आनंद साजरा करत आणि  त्यांचे तोंड गोड करत ह्या  नवकीर्ती उपक्रमाची सांगता झाली. ह्या संपूर्ण नवकीर्ती उपक्रमाला  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद जोग सर सोबतच उपप्राचार्य डॉ. मीनल मापुस्कर मॅडम ह्यांनी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य ही केले. सोबतच राष्ट्रिय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रतिभा बिस्वास मॅडम, प्रा. अंकुश दळवी सर आणि प्रा. पूजा कांबळे मॅडम ह्यांनी  वेळोवेळी पाठपुरावा घेत  नवकीर्ती उपक्रम पूर्ण होण्यास बारकाईने लक्ष दिले आणि सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाने स्वयंसेवकांनी उत्तमरीत्या नवकीर्ती उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com