दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ.धनंजय सावळकर यांनी घेतला ई-ऑफिस प्रणालीचा आढावा....ई-ऑफिस प्रणाली गतिमान करण्याचे निर्देश
महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामध्ये ई-ऑफिस प्रणालीद्वारे कार्यालयीन कामकाज सुरु असून या कामाला गतिमान करण्याचे निर्देश महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ.धनंजय सावळकर यांनी आज येथे दिले. त्यांनी ई-ऑफिस प्रणालीबाबत सविस्तर आढावा घेतला. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ई-ऑफिसप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी विशेष आयटी सहाय्यकांची टीम तयार करून ई-ऑफिस संदर्भातील कामकाज सुरु आहे. त्यामुळे शासनाकडून आलेले पत्रव्यवहार आणि शासनाला करायचे पत्रव्यवहार जलदपणे निपटारा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. डॉ. सावळकर यांनी सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची आढावा बैठक घेऊन कामाची सध्यस्थिती जाणून घेतली. ज्या विभागाचे संदर्भ प्रलंबित आहेत त्यांनी तात्काळ याबाबत निपटारा करून प्रशासन विभागास अहवाल सादर करण्याची सूचना त्यांनी केली. नजिकच्या काळात महामंडळाचे संपूर्ण कामकाज ई-ऑफिसप्रणाली द्वारे करून पेपरलेस व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
0 टिप्पण्या