डॉ. बी आर आंबेडकर ग्रूप पनवेलकर संकुल बदलापूर यांच्या वतीने १२ ऑक्टोबर २०२४, रोजी धम्मचक्र प्रवर्तन व अशोक विजयादशमी सोहळा अतिशय मोठ्या जल्लोषात पनवेलकर संकुल या ठिकाणी पार पडला. कार्यक्रमाची सुरवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार, दिपप्रजोलन करुन बौध्दचार्या भगवान जाधव गुरूजी यांनी बुद्धवंदना घेतली.उपस्थितांना प्रमुख वक्ते आदरणीय. ॲड.नितीन तांबे ( उच्च न्यायालय- मुंबई) त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते आयु. महेश जाधव साहेब आणि मृणालताई जाधव हजर होत्या. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यात डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रूप संकुलच्या सर्वच युवकांनी मोलाचे योगदान दिले.कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली अश्या सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 टिप्पण्या