दोंडाईचा, जि. धुळे, तसेच जि. नंदुरबार येथे मुस्लीम समजाच्या जुलूसवर करण्यात आलेल्या दगडफेकी मध्ये मुस्लीम समाजाच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा अनेक घटना सध्या महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत. मात्र याचा सरळ आरोप मुस्लिम समाजावर ठेवून मुस्लिम समाजातील लोकांना अटक करण्याचे सत्र पोलिस प्रशासन करीत आहेत. हा प्रशासनाचा दुटप्पीपणा असून मुस्लिम समाजाला जाणिवपूर्वक टार्गेट केले जात आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप आज समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी केला. मागील काही महिन्यांपासून मुस्लिम समाजावरील अत्याचार अन्यायाच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. मात्र येथील शासन आणि प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे असेही आझमी यांनी स्पष्ट केले. आज मुंबईतील मराठी पत्रकार संघात प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
मी स्वतः ५ ऑक्टोंबर, २०२४ रोजी दोंडाइचा, जि. धुळे येथे जाऊन तेथील पोलीस प्रशासन अधिकारी आणि जवाबदार व्यक्तींना भेटलो. ज्या दिवशी मोहम्मद पैगंबर हजरत स.व.स. यांचा जन्मदिवस होता, त्याचा जुलूस गणपती विसर्जन असल्याकरणाने न काढता दुसरी तारीख काढून जुलूस काढण्यात आला. त्याचे कौतुक करण्याच्या जागी जुलूसवर दगडफेक करण्यात आली. दोंडाइचाच्या नागरिकांनी ईद मिलादुन नबीच्या जुलुसची परवानगी १६ सप्टेंबर रोजी मागितली असता त्यांना परवानगी नाकारण्यात आली. जुलूस साठी त्यांना १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताची परवानगी देण्यात आली. १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जुलूस काढण्यात आलेला असताना तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ २५० लोक जमा झाले व त्यांनी मुस्लिमांच्या आणि इस्लाम धर्माच्या विरोधात घोषणाबाजी करून दगडफेक केली. वेळेवर तेथे पोलीस यंत्रणा उपस्थित असूनही सदर घटनेला थांबवण्यात नाही आले. यावर मुस्लीम समजाची प्रतिक्रिया आली तेव्हा पोलीस प्रशासनातर्फे मुस्लीम समाजाच्या जुलूसवर लाठीचार्ज व अश्रुधुरांच्या कांड्या फेकण्यात आल्या, जुलूसवर दगडफेक पहिले विरोधकांकडून करण्यात आले याचा व्हिडीओ सुद्धा आहे. तरीही याबाबत कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही.
तसेच सकाळी ११:०० वाजता मोइनुद्दिन नामक व्यक्ती एफ.आय.आर. दाखल करण्यास गेला असता त्याची तक्रार रात्री १:०० वाजता घेण्यात आली. याउलट पोलीस प्रशासनाने हिंदू समाजाकडून स्वतःहून एफ.आय.आर. दाखल करून घेतला. यामध्ये एकाही हिंदू समाजाच्या व्यक्तीचे नाव टाकण्यात आले नाही. उलट २६ लोकांना अटक करण्यात आली जे मुस्लीम समाजाचे होते. खरे तर त्यांचा या घटनेमध्ये कोणताही संबंध नव्हता इतकेच काय ते तिथे उपस्थितही नव्हते. या शिवाय पोलीस प्रशासन आता घरोघरी जाऊन तपास घेत आहेत, यामुळे मुस्लिम समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदू समाजाच्या केवळ ८ लोकांना अटक करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडे सर्व घटनेचा व्हिडीओ असून सुद्धा ते न बघता पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. चिरंजीवी चौधरी, निखील राजपूत व सुधीर मराठे जे नगरसेवक विजय मराठेचे भाऊ हे सर्व बीजेपीचे नगरसेवक आहेत आणि यांची या प्रकरणामध्ये प्रमुख भूमिका आहे. हे लोक आज नागरिकांमध्ये मुस्लीम समाजाकडून कोणतेही खरेदी विक्री करू नका, मुस्लीम समजाच्या लोकांना काम देऊ नका असा प्रचार करत आहे. तसेच दंगाई लोकांनी मुस्लीम लोकांचे दुकाने बंद करून स्वतःचे दुकाने सुरु केली आहे.
इतकेच नव्हे तर पोलीस प्रशानाने कौसर मुसा नामक व्यक्ती ३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर जेल मध्ये असतानाही त्याचे नाव गुन्ह्यामध्ये टाकण्यात आले आहे. हे पोलीस प्रशासनाच्या अन्यायकारक करण्यात येत असलेल्या कारवाई चे एक उदाहरण आहे.ज्यांनी विरोधी घोषणाबाजी व दगडफेक करण्यास सुरुवात केली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व मुस्लीम समाजातील निरपराध लोकांवर टाकण्यात आलेले गुन्हे मागे घेऊन त्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी आझमी यांनी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
जि. नंदुरबार येथे देखील १९ सप्टेंबर रोजी ईद मिलादुन नबी चा जुलूस काढण्यात आला जुलूस माळीवाडा येथे पोहचला असता जुलूसवर दगडफेक करण्यात आली. गर्दीला पळविण्यासाठी पोलीस यंत्रणा कमी होती. दोन तास गाड्या जाळण्यात आल्या व घरात घुसून सामानाचे तोडफोड करण्यात आले. निलेश श्रीराम मालू जे जिल्हाध्यक्ष आहे त्यांचा पूर्ण परिवाराने दंग्याला पसरवले. सदर घटनेबाबत १५० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यापैकी ५१ मुस्लीम समजाच्या लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यामधील ७ जणांचे वय १८ वर्षाखालील आहे. दुसऱ्या बाजूला विरोधकांमध्ये ४८ जणांचे नाव नोंदविण्यात आले आहे. परंतु ते लोक शहरात फिरत आहे. मुस्लीम समजातील ज्या लोकांवर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. त्यांपैकी ८० लोक सदर घटनेच्या वेळेस उपस्थितही नव्हते. अशा तऱ्हेने राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवल्या जात असून यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी आझमी यांनी केली.
0 टिप्पण्या