Top Post Ad

ठाण्यातील 18 विधानसभा मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची  मतदान प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी सुरळीत पार पडली असून जिल्हा प्रशासन मतमोजणी प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी प्रक्रिया ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघात होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून यासाठी आवश्यक मनुष्यबळ व सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.


     134 भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी फरहान खान हॉल, मिल्लत नगर, ममता हॉस्पिटलच्या मागे, पहिला मजला भिवंडी येथे होणार आहे. 135 शहापूर अ.ज. विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी डॉ.शिवाजीराव जोंधळे कॉलेज, आसनगांव, ता.शहापूर येथे, 136 भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी वऱ्हाळदेवी मंगमाता भवन हॉल, कामतघर, भिवंडी येथे, 137 भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी स्व.संपदा सिताराम नाईक, मंगल भवन, पहिला मजला, भादवड, ता.भिवंडी येथे, 138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाची मतमोणी मुंबई विद्यापीठ उपकेंद्र, तळमजला, वसंत व्हॅली रोड, वृंदावन पॅराडाईज, गांधारनगर, खडकपाडा, कल्याण पश्चिम येथे, 139 मुरबाड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती गोडाऊन, मुरबाड, 140 अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी महात्मा गांधी  विद्यालय व ताई कोळकर कनिष्ठ महाविद्यालय, के.बी. रोड, अंबरनाथ प. 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी नवीन प्रशासकीय इमारत, पवई चौक,हिराघाट, उल्हासनगर 3 येथे होणार आहे.

     142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ‍ महिला उद्योग केंद्र रॉयल रेजेन्सीच्या पाठीमागे, राजाराम जाधव मार्ग, साईनाथ, विठ्ठलवाडी स्टेशन समोर, कल्याण येथे 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी आय.ई.एस चंद्रकांत नारायण पाटकर चॅरिटेबल ट्रस्टचे पाटकर विद्यालय, राजाजी रोड, डोंबिवली, पूर्व, ता.कल्याण येथे, 144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, तळमजला, के.डी.एम.सी ग्राऊंड, जलतरण तलाव बिल्डींग डोंबिवली पूर्व येथे, 145 मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तळमजला, स्व. प्रमोद महाजन हॉल, फेस 11, गोडदेव, भाईंदर, पूर्व येथे, 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूल, पहिला मजला, आनंदनगर, कावेसर, घोडबंदर रोड, ठाणे येथे 147 ठाणे विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी न्यू होरायझन एज्युकेशन सोसायटी, सी इमारत, रोडास सोसायटी जवळ हिरानंदानी इस्टेट, कोलशेत ठाणे येथे, 149 मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी श्री.मोलाना अबुल कलाम क्रिडा संकुल कौसा, मुंब्रा येथे, 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सरस्वती विद्यालय सेक्टर 5 ऐरोली नवी मुंबई येथे तर 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी आगरी कोळी सांस्कृतिक भवन, सेंक्टर 24 नेरुळ, नवी मुंबई येथे होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com