ठाणे जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी
- कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघ - एकनाथ शिंदे, शिवसेना
- ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ - प्रताप सरनाईक, शिवसेना
- ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ - संजय केळकर, भाजप
- ऐरोली विधानसभा मतदारसंघ - गणेश नाईक, भाजप
- बेलापूर विधानसभा मतदारसंघ - मंदा म्हात्रे (भाजप)
- उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ - कुमार आयलानी (भाजप)
- अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ - विश्वनाथ भोईर, शिवसेना
- मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ - जितेंद्र आव्हाड, शरद पवार
- भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - शांताराम मोरे (शिवसेना)
- भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ - अशोक पाटील, शिवसेना
- भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ - महेश चौगुले, भाजप
- डोंबिवली विधानसभा मतदारसंघ - रविंद्र चव्हाण, भाजप
- शहापूर विधानसभा मतदारसंघ - दौलत दरोडा, राष्ट्रवादी
- मुरबाड विधानसभा मतदारसंघ - किसन कथोरे, भाजप
- मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ - नरेंद्र मेहता, भाजप
- कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ - सुलभा गायकवाड, भाजप
- कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - राजेश मोरे, शिवसेना
- कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ - बालाजी किणीकर, शिवसेना
समर्पित भावनेनं महाराष्ट्राच्या समृध्दीसाठी आणि सामन्यांच्या कल्याणासाठी राबणाऱ्या महायुती सरकारला निर्विवाद आणि घवघवीत यश मिळाले आहे. महाराष्ट्रात महायुतीच लाडकी ठरली. हा विजय माझ्या लाडक्या बहिणींचा आहे, लाडक्या भावांचा, लाडक्या शेतकऱ्यांचा आहे. राज्यातल्या कॉमन मॅनने सुपरमॅनसारखे मतदान केले. त्यामुळे हा विजय राज्यातल्या सर्वसामान्यांचा आहे, सर्वसामान्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सरकारचा आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या आशीर्वादाचा, विचारधारेचा हा विजय आहे', - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
0 टिप्पण्या