Top Post Ad

महाराष्ट्र विधानसभा उत्सव 2024... तरुण तगडा भारत अभियान

इको फ्रेंडली लाईफ या पर्यावरण संरक्षण विषयक काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून आणि तरुण तगडा भारत अभियानच्या वतीने तरुण उमेदवारांना पाठिंबा ही महत्त्वाकांक्षी मोहीम राबवली जात आहे.  जगात सर्वात जास्त तरुणांची संख्या भारतात तरीही तरुणांचे नेतृत्व नाही देशात. या परिस्थितीला बदलण्यासाठी महाराष्ट्रासह देशामध्ये तरुणांचे नेतृत्व पुढे यावं यासाठी तरुणांमध्ये जागृती येणं आवश्यक आहे. यासाठी पर्यावरण तज्ञ सर अशोक एन. जे. यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण तगडा भारत अभियान राबवले जात आहे  

 


 पर्यावरणाच्या संरक्षणासाठी देखील तरुणांशिवाय तरणोपाय नाही. ७०० करोड फळझाडे भारतभरात लावण्याचा महासंकल्प सर अशोक एन जे यांनी केला आहे. तो प्रत्यक्षपणे देशभरात राबविला जात आहे. ज्यामध्ये भारतभरातील तरुणांनी त्यात हिरीरीने सहभाग घेत आहेत,  याद्वारे वॉटर हार्वेस्टिंग इको व्हिलेज इको हाऊस इत्यादी प्रकल्पांचे प्रात्यक्षिक पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी सर्व तरुणांना मिळत आहे .तरुणाईच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाबरोबरच महाराष्ट्राचा शाश्वत विकास आणि देशाचा सर्वांगीण शाश्वत विकास या मोहिमेला गती देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सरकार आणण्याचे उद्दीष्ट याद्वारे ठेवण्यात आले आहे. 

यासाठी  ठाणे इथून जागृती रथ यात्रेची शानदार सुरुवात करण्यात आली. सर अशोक एन.जे. संस्थापित इको फ्रेंडली लाईफ आणि संकल्पित करून तगडा भारत अभियान सामाय माध्यमातून विधानसभा 2024मध्ये तरुण उमेदवारांना पाठिंबा ही मोहीम चालवली जात आहे. जागृती रथ यात्रे सोबतच पथनाट्याद्वारे देखील जनजागरण करण्यात येत आहे. 5 नोव्हेंबर रोजी ठाण्यातील महागिरी परिसरातील एकविरा मंडळाच्या पटांगणात पथनाट्य सादर करण्यात आले. उपस्थितांनी याचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर तलावपाळी ठाणे या ठिकाणीही एक शो करण्यात आला . सदर उपक्रमास तरुणाईचा पाठिंबा मिळत आहे आणि जनतेतून ही या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे .

  • तरुणांच्या हाती सत्ता देऊया महाराष्ट्राचा आणि देशाच्या विकास साधण्यासाठी एक पाऊल उचलूया.
  • उचलूया एकच पाऊल दमदार... बनवूया तरुण तगडे आमदार
  • तरुणांच्या हातात देशाच्या विकासाची सूत्रे गेल्यास देशाचा विकास गतिमान होऊ शकतो!
  • तरुणांना साथ देऊया...देशाचा विकास करूया
  • उठ तरुणा जागा हो ...संघर्षाचा धागा हो
अशा विविध घोषणांनी परिसरात जनजागृती होत असून याला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com