महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी आवर्जून सहभाग घ्यावा यासाठी कीर्ती महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाने ' मतजागृती पंधरवडा ' या उपक्रमाचे आयोजन केले. दिनांक ३ नोव्हेंबर ते दिनांक १८ नोव्हेंबर या कालावधीत १५ दिवस स्वयंसेवकांनी विविध कार्यक्रमांच्याद्वारे मतदान जनजागृती केली. यात पहिल्या दिवशी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत स्वयंसेवकांनी मतदान जनजागृती वर रांगोळ्या काढून जनजागृती केली. ४ नोव्हेंबर ते ८नोव्हेंबर ह्या कालावधीत डोर टू डोर कॅम्पेन करण्यात आली ज्यामध्ये स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन मतदान करण्यास सर्वांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. आणि लोकशाहीचे महत्त्व पटवून दिले.
घोषवाक्य तसेच पोस्टर मेकिंग या कार्यक्रमांचे आयोजन अनुक्रमे दिनांक ९ आणि १० नोव्हेंबरला करण्यात आले आणि स्वयंसेवकांनी बनवलेल्या घोषवाक्य तसेच पोस्टर्स च दिनांक ११नोव्हेंबरला महाविद्यालयात प्रदर्शन भरवण्यात आलं यामध्ये महाविद्यालयात विविध ठिकाणी मतदान जगजागृती चे पोस्टर्स तसेच घोषवाक्य चिटकवून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला. सोबतच 12 तारखेला महाविद्यालयाच्या गेटवर स्वयंसेवकांनी अवेअरनेस डेक्स लावून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच नव मतदारांना मतदानाबद्दल जागरूक केले सोबतच वोटर हेल्पलाइन या एप्लीकेशन बद्दल माहितीही देण्यात आली. मतदानाचा अधिकार आपल्याला संविधानाने दिला असून निवडणूक ही आपल्यासाठी लोकशाहीचा सोहळा आहे असे स्वयंसेवकांना वाटत होते आणि त्यामुळे मतजागृती पंधरवडा साजरा करत असताना स्वयंसेवकांनी आकर्षकरीत्या तसेच पारंपारिक पद्धतीने मतदान जनजागृती व्हावी त्यासाठी महाविद्यालयीन परिसरात भव्य रांगोळीचे रेखाटन केलेजवळपास सात फूट लांबीची आणि चार फूट रुंदीची रांगोळी साई हडवळे, लक्ष्मी शहा, वेदांग भोपी, दिव्या राणे, हर्षिया कांबळे, आरंभी कलगुटकर, प्रतीक्षा भालेकर , हर्षदा त्रिमुखे , हर्षदा घरबुडवे, प्रज्ञा मोहिते आणि ओमकार वाक्कर या स्वयंसेवकांनी मिळून साकारली. सोबतच सामूहिक चर्चा आणि ऑनलाईन व्याख्यान ही झाले. दिनांक १७ नोव्हेंबर रोजी निवडणुक आयोग यांच्यासोबत दादर परिसरात जनजागृती केली ज्यामध्ये पथनाट्य सादर करून मतदारांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटच्या दिवशी सर्वांनी शपथ घेऊन लोकशाही सुदृढ करण्याचा प्रण घेतला.
0 टिप्पण्या