भारतीय सैन्य दलातील शौर्यचक्र विजेते युद्धवीर मधुसूदन सुर्वे आणि लेफ्टनंट कर्नल संतोष मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल शांतीवन येथील कुष्ठरोगी आणि वृद्ध बांधवांसमवेत सहभोजन, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य तसेच महिलांना साडी वाटप करून संवेदना फाउंडेशन तर्फे आज मोठया उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. संवेदना फाउंडेशन तर्फे गेली १९ वर्ष कुष्ठरोग निवारण समिती, नेरे पनवेल येथे दिवाळीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी मराठा मंदिरचे उपाध्यक्ष विलासराव देशमुख, माजी पोलीस निरीक्षक अविनाश सोनकर, कस्टम अधिकारी सत्यवान रेडकर, कुष्ठरोग समितीचे समाजकार्यकर्ता संतोष ढोरे, संवेदना फाउंडेशन अध्यक्ष विनोद चाळके, ॲड. रंजना खोचरे, गायक किशोर गवांदे, पोलीस निरीक्षक रवींद्र दुशारेकर, सिने अभिनेती ईश्वरी शेट्ये, अभिनेता मितेश आगणे, सहारा अकादमीचे एस पवार, शांतीवनचे सीईओ नंदकुमार उरणकर,समाजसेवक एकनाथ भिसे, राजेन्द्र वोरा आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या